Source :- ZEE NEWS
China Helps Pakistan: चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय.चीननं पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिलाय…म्ही पूर्णपणे पाकिस्तानसोबत आहोत असं म्हणत पाकिस्तानच्या कुरापतींना चीनने उघड उघड पाठिंबा दर्शवलाय. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांना फोन करून हा पाठिंबा दिल्याचं कळतंय.
पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या भ्याड हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जातंय. भारत पाकच्या हल्ल्यांचा बदला घेत असतानाच चीनला मात्र पाकचा पुळका आलाय. चीनने भारताला शांतता राखण्याचा सल्ला दिलाय तर दुस-या बाजूला पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिलाय. चीनच्या या कृत्यामुळे चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्यानंतर याच चीनने भारताचं तोंडभरून कौतुक केलं होतं. मात्र पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर चीन पाकिस्तानच्या बाजूनं गेलाय.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना फोन करून संवाद साधला. आणि त्यानंतर वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनाही फोन केला.
पाकिस्तानचा धोरणात्मक सहकारी, भागीदार आणि मित्र म्हणून चीन कायम पाकिस्तानसोबत राहणार. पाकिस्तानचं सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य टिकवण्यासाठी चीन खंबीरपणे पाकिस्तानसोबत उभा आहे
पाकिस्तान आणि चीनमधील संबंध अधिकदृढ करण्यावर सहमती झाल्याची माहिती पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी दिलीये. शांततेचा संदेश देणारा चीन आता पाकिस्तानच्या कुरापतींना पाठिंबा देत असल्याने पाकिस्तान पुन्हा आगळीक करण्याची शक्यता आहे. कारण केवळ चीनचं नव्हे तर तुर्कीये नं देखील पाकला मदत करण्यास सुरुवात केलीये.
पाकिस्तान-चीनी भाई-भाई
पाकिस्तान आणि चीनमध्ये मजबूत संबंध निर्माण झालेयत. राजकीय, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात दृढ संबंध पाहायला मिळतात. चीनकडून पाकिस्तानला आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवण्यात येते. दोन्ही देशांचं एकमेकांना संरक्षण तंत्रज्ञानावर सहकार्य आहे.
पाकिस्तानकडून भारतावर डागण्यात आलेले अनेक मिसाईल हे चीनी बनावटीचे असल्याचं समोर आलं होतं. त्या मिसाईलच्या अवशेषांमुळे चीन पाकिस्तानला पाठिंबा करतोय हे स्पष्ट झालं होतं. आता चीनच्या पराराष्ट्र मंत्र्यांनी उघडपणेच पाठिंबा दिलाय. चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला तरी भारत दहशतवादाविरोधातील कारवाया सुरुच ठेवणार असा इशारा NSG अजित डोवाल यांनी देत भारताची भूमिका स्पष्ट केलीये.सोबतच भारत कोणालाही घाबरणार नाही हे देखील स्पष्ट केलंय.
SOURCE : ZEE NEWS