Source :- ZEE NEWS

Gold prices to fall below Rs 56,000 : सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. सोन्याने जवळपास लाखाचा आकडा गाठला. आता सोन्याच्या दरात घसरण देखील सुरु झाली आहे. अशातच चर्चा रंगली आहे ती सोनं 56 हजार रुपयांनी स्वस्त होणार अशी. सोन्याची दरात खरचं एवढी मोठी घसरण होण शक्य आहे का? काय आहे तज्ञांचे मत जाणून घेऊया. 

सोने खरेदीदार आणि गुंतवणूकदारांमध्ये सध्या एकच चर्चा आहे. सोने खरोखरच इतके स्वस्त होईल की ते प्रति 10 ग्रॅम 56 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचेल. मागील काही वर्षांपासून  सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते का? या शक्यतेमागची कारणे आणि तज्ञांचे मत जाणून घेऊया.

सोन्याच्या दर वाझत असतानाच  जागतिक आर्थिक स्तरावर अनेक बदल दिसून आले आहेत, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव येऊ शकतो. या दबावाचे प्रमुख कारण आहे वाढते व्याजदर. जगभरातील मध्यवर्ती बँका, विशेषतः अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, महागाई नियंत्रित करण्यासाठी सतत व्याजदर वाढवत आहेत. वाढत्या व्याजदरांमुळे बाँड्ससारख्या इतर सुरक्षित गुंतवणुकी अधिक आकर्षक बनतात, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी होऊ शकते. सोने कोणतेही उत्पन्न देत नसल्यामुळे, उच्च व्याजदराच्या मागणीत सोन्यातील गुंतवणुकीत मोठी कपात होऊ शकतो. परिणामी सोन्याचे दर कमी होऊ शकताता. 

जेव्हा अमेरिकन डॉलर मजबूत होतो तेव्हा इतर चलनांसह खरेदीदारांसाठी सोने महाग होते. सध्या, अमेरिकन अर्थव्यवस्था तुलनेने मजबूत दिसते, जी डॉलरला आधार देते. डॉलरच्या मजबूतीचा सोन्याच्या किमतींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जागतिक स्तरावर चलनवाढीचा दबाव कमी झाला, तर सोन्याची हेजिंग मागणी (चलनवाढीपासून संरक्षण) देखील कमी होऊ शकते. सोन्याला अनेकदा महागाईपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान मानले जाते आणि जर महागाई कमी झाली तर त्याची मागणी कमी होऊ शकते.

सध्या अनेक भूराजकीय तणाव असले तरी, भविष्यात जागतिक पातळीवर स्थिरता आली तर सोन्याची सुरक्षित मागणी कमी होऊ शकते. अनिश्चिततेच्या काळात, गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात.
सोने खरोखरच ५६ हजार रुपयांपर्यंत घसरू शकते का?

सध्याची परिस्थिती पाहता, काही विश्लेषक सोन्याच्या किमतीत घट होण्याची शक्यता नाकारत नाहीत. तथापि, प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांची पातळी ही एक लक्षणीय घसरण असेल. एकाच वेळी वरील नमूद सर्व शक्यता प्रत्यक्षात लागू झाल्या तरच सोन्याचा दर 56,000 रुपयांवर येऊ शकतो .

अनेक आर्थिक विश्लेषकांचा असा विश्वास आहे की सोन्याच्या किमतींवर दबाव कायम राहील. यामुळे सोन्याचे दर कमी झाले तरी इतकी मोठी घसरण होण्याची शक्यता कमी असल्याचादा अनेक तज्ञांचा दावा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अजूनही अनिश्चितता असली तरी सोनं ही कायम सुरक्षित मालमत्ता राहील.

SOURCE : ZEE NEWS