Home LATEST NEWS ताजी बातमी जाड मांड्या आणि दीर्घायुष्याचा ‘असा’ आहे संबंध; नव्या अभ्यासातून काय समोर आलं?

जाड मांड्या आणि दीर्घायुष्याचा ‘असा’ आहे संबंध; नव्या अभ्यासातून काय समोर आलं?

7
0

Source :- BBC INDIA NEWS

अनेक देशांमध्ये फार पूर्वीपासून सडपातळ पाय हे सौंदर्याच्या मानकांचा एक भाग मानले गेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

“माझ्या मांड्या एवढ्या जाड नसत्या तर बरं झालं असतं.”

ब्रिटिश धावपटू ताशा थॉम्पसन तिच्या मांड्यांबद्दल विचार करायची, तेव्हा प्रत्येकवेळी तिच्या मनात हेच विचार यायचे.

अनेक देशांमध्ये फार पूर्वीपासून सडपातळ पाय हे सौंदर्याच्या मानकांचा एक भाग मानले गेले आहेत.

शरीराच्या ठेवणीबाबतच्या या विशिष्ट अपेक्षा तुम्हाला पूर्ण करता आल्या नाही तर तुम्हाला अपयशी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते, असं थॉम्पसन यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसशी बोलताना म्हटलं.

पण आता अनेक संशोधनांमधून समोर आलेल्या तथ्यांचा विचार करता, जाड मांड्यांच्या मुद्द्यावरून केली जाणारी टीका अन्यायकारक असून याचा संबंध उलट दीर्घायुष्याशी असू शकतो, असं म्हटलं जात आहे. .

25 हजार जणांचा सहभाग असलेल्या एका व्यापक अभ्यासाच्या निष्कर्षांचा विचार करता, मांडीच्या घेरामध्ये होणाऱ्या प्रत्येक 5 सेंटीमीटरच्या वाढीमुळं कोणत्याही कारणामुळं होणाऱ्या मृत्यूचा धोका जवळपास 18 टक्क्यांनी घटू शकतो.

पण मग म्हणजे आपण मुद्दाम मांड्या जाड होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असा याचा अर्थ होतो का?

जाड मांड्या असण्याचे फायदे काय?

तज्ज्ञांच्या मते, 2020 मधील या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार काही जण अधिक काळ जगण्याचं एक कारण म्हणजे, त्यांच्या पायांचे स्नायू अधिक जाड होते. त्यामुळं त्यांच्या मांड्या सुडौलही होत्या.

ब्रिटनच्या किंग्ज कॉलेज लंडन (KCL) च्या प्राध्यापिका क्लेअर स्टीव्हज यांच्या मते, “मांड्यांमध्ये असलेल्या तीन उतींपैकी एक म्हणजे स्नायू. या स्नायूचा उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे भक्कम पुरावे आहेत.”

शरीरात अधिक स्नायू असल्यानं रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळं मधुमेह, हृदयरोग आणि इतर दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’मध्ये 2009 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही कमी जाड मांड्या असणं हृदयविकार आणि मृत्यूच्या वाढत्या धोक्याशी संबंधित असल्याचं आढळून आलं.

ताशा थॉम्पसन लहानपणापासून मांड्याबाबत आनंदी नव्हत्या.

फोटो स्रोत, Delene Adams

मजबूत मांड्या शरीरातील अशक्तपणा टाळण्यासही मदत करू शकतात.

लंडनमधील गाय्स अँड सेंट थॉमस हॉस्पिटलमधील सल्लागार डॉ. स्टिव्हन्स स्पष्टपणे म्हणतात की, “वृद्धापकाळात दैनंदिन कामांसाठी क्वाड्रिसेप्स स्नायू अत्यावश्यक असतात. त्यांच्या मदतीनंच आपण खुर्चीवरून उठून चालू शकत असतो.”

म्हातारपणी आपला मेंदू किती चांगल्या प्रकारे काम करतो, याचा थेट संबंधही आपल्या पायांच्या शक्तीशी असतो.

याबाबत 300 हून अधिक जुळ्यांवर केलेल्या अभ्यासात एक बाब आढळून आली. या अभ्यासाच्या सुरुवातीला ज्या जुळ्यांचे पाय अधिक मजबूत होते, त्यांची दहा वर्षांनंतर विचार करण्याची क्षमता आणि मेंदूची रचना अधिक चांगली होती, हे पाहायला मिळालं.

फिटनेस कोच एलिझाबेथ डेव्हिस यांनीही मांड्यांचा आकार बदलण्याऐवजी त्यांचे स्नायू बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Ella Cuchet

पण, असं का घडतं? शास्त्रज्ञांच्या मते, सक्रिय स्नायू काही विशिष्ट रसायने तयार करतात. ही रसायनं वाढत्या वयानुसार येणारी सूज कमी करू शकतात आणि मेंदूच्या नेटवर्कचे संरक्षण करून मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

हा अभ्यास करणाऱ्या डॉ. स्टिव्हस पुढं म्हणाले की, “शारीरिक हालचालींचा आपल्या रोगप्रतिकार शक्तीवरही मोठा परिणाम होतो.”

अत्यंत सक्रिय अशा वयस्कर सायकलपटूंवर केलेल्या केसीएलच्या आणखी एका अभ्यासात असं आढळून आलं की त्यांची रोगप्रतिकार शक्ती तरुणांसारखी होती. काही जणांमध्ये तर ती 20 वर्षांच्या तरुणाच्या रोगप्रतिकार शक्तीबरोबर तुलना करता येईल, अशी होती.

मांड्या कशा मजबूत बनवाव्यात?

फिटनेस कोच एलिझाबेथ डेव्हिस यांनीही मांड्यांचा आकार बदलण्याऐवजी त्यांचे स्नायू बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे.

“तुम्हाला स्वतःच्या मांड्या लहान आहेत त्या मोठ्या किंवा वेगळ्या दिसाव्यात असं वर्षानुवर्षे वाटत असेल तर आता तो विचार सोडण्याची वेळ आली आहे. त्याऐवजी तुमच्या मांड्या काय करू शकतात यावर लक्ष द्यायला हवं,” असं त्यांनी म्हटलं.

मांड्या लहान असोत वा जाड. त्या तरीही मजबूत असू शकतात, यावर त्यांनी जोर दिला आहे.

आकारापेक्षा ताकदीवर भर देणं याला शास्त्रीय आधार आहे. 2006 मध्ये 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवर केलेल्या अभ्यासात लहान स्नायूंपेक्षा पायांचे कमकुवत स्नायू अधिक धोकादायक असू शकतात, असं आढळून आलं.

मांड्यांचा आकार बदलण्याऐवजी त्यांचे स्नायू बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images

डेव्हिस यांच्या मते, तुम्हाला मांड्यांची ताकद वाढवायची असेल, तर रेझिस्टन्स ट्रेनिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. वजन उचलल्यामुळं हाडांची घनता सुधारते आणि ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत होते. ऑस्टिओपोरोसिस यात हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात त्यामुळं फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

डेव्हिस यांनी यासाठी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा पायांच्या व्यायामाने सुरुवात करणं सर्वोत्तम असल्याचं म्हटलंय.

“सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या क्षमता समजून घेणे आणि मग हळूहळू आव्हानं वाढवत जावी,” असं त्या सुचवतात.

वजन उचलणं हा कदाचित तुमचा आवडता व्यायाम नसेल, पण तो दैनंदिन दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनवावा, असं डेव्हिस सांगतात. मला फ्लॉसिंग करायला आवडत नाही, पण मी ते करते कारण मला माहिती आहे की त्यामुळं माझे तोंड स्वच्छ आणि निरोगी राहतं, असं त्या म्हणतात.

आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंगचा आनंद मिळावा सासाठी मदत करणाऱ्या लहान-लहान गोष्टींकडं लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्या सांगतात. कारण त्यामुळं आपल्याला ठोस फायदे मिळतात.

मांड्यांवरील चरबीचे काही फायदे आहेत का?

मांड्यांवरील चरबी शरीराच्या इतर भागांतील चरबीइतकी हानिकारक नसते. विशेषतः पोटाभोवतीच्या चरबीच्या तुलनेत. स्टिव्ह्स यांच्या मते, पोटावरील चरबी ही अधिक त्रासदायक ठरू शकते.

अवयवांभोवती साठणाऱ्या चरबीला व्हिसेरल फॅट म्हणतात. यामुळं टाईप 2 मधुमेह, हृदयरोग आणि चयापचय बिघाडाशी संबंधित स्टिटोहेपेटायटिस (MASH) यांचा धोका वाढू शकतो. तसंच यामुळं यकृत निकामी होण्याचा आणि कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो.

अभ्यासानुसार, शरीराच्या खालच्या भागात साठलेली चरबी एक प्रकारचं संरक्षणही देऊ शकते, कारण या भागातील चरबीच्या पेशी हानिकारक फॅटी ॲसिडला स्वतःमध्ये अडकवून ठेवू शकतात.

डेव्हिस यांच्या मते, तुम्हाला मांड्यांची ताकद वाढवायची असेल, तर रेझिस्टन्स ट्रेनिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे.

फोटो स्रोत, Getty

म्हणजेच शरीरातील चरबी कमी केल्यानं ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जाणारं एलडीएल (LDL) कमी होऊ शकतं. तर ‘चांगलं’ कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जाणारं एचडीएल (HDL) वाढू शकतं आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.

चरबीचं आणखी एक काम म्हणजे, आजारपणात ती शरीरासाठी आपत्कालीन ऊर्जेचा साठा म्हणून काम करू शकतात. विशेषतः वृद्ध लोकांसाठी ती उपयुक्त ठरू शकते.

मांड्यांमध्ये आढळणारी दुसरी प्रमुख ऊती म्हणजे हाड. जसजसं आपलं वय वाढतं, तसं सार्कोपेनिया नावाच्या स्थितीमुळे आपण स्नायूंची शक्ती आणि आकार गमावू शकतो.

सार्कोपेनियामुळं ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो. त्यामुळं हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात. वाढत्या वयानुसार हाडे मजबूत असणे देखील फायदेशीर ठरते. स्टीव्ह्स यांच्या मते, रेझिस्टन्स ट्रेनिंगमुळं हाडं मजबूत होण्यास मदत होऊ शकते.

‘जाड नव्हे शक्तीशाली’

‘ब्लॅक गर्ल्स डू रन युके’च्या संस्थापक थॉम्पसन यांच्या मते, “मांड्यांना जाड किंवा मोठं म्हणण्याऐवजी, मी त्यांना शक्तिशाली म्हणते.”

त्यांनी अल्ट्रा मॅरेथॉन आणि ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला आहे.

“आपण सर्वांचं शरीर वेगवेगळ्या आकारांचं आणि बांध्याचं असतं. तुमचं शरीर कसं दिसते हे महत्त्वाचं नसतं तर ते काय करू शकतं हे महत्त्वाचं असतं.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC