Source :- ZEE NEWS

Tsunami in japan in 2025 : 2025 या वर्षातील जुलै महिना हा अत्यंत महभयानक असणार आहे. जुलै 2025 मध्ये जपान देशात भयंकर महाविनाश होणार आहे. या महाविनाशात तब्बल 3 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. ही भविष्यवाणी कुण्या  भविष्यवेत्याने नाही तर जपान सरकारने केली आहे. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी काय करावे याबाबतची सूचना देखील जपान सरकारने जारी केली आहे.  

जपानमध्ये महाप्रलयकारी त्सुनामी येणार आहे. एका शक्तिशाली सागरी भूकंपामुळे हा त्सुनामी येऊ शकतो. समुद्रात होणाऱ्या या भूकंपाची तीव्रता 9.0 किंवा त्याहून अधिक असू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.  जपानमधील टोकोहोकू, शिझुओका, ओसाका आणि टोकियोच्या किनारी भागांसह येथील अनेक भागांना उच्च धोका घोषित करण्यात आला आहे. सरकाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारने आधीच अलर्ट जारी केला असून धोका ओखून आधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन जपान सरकारने नागपिकांना केले आहे. 

यापूर्वी देखील जपानमध्ये महाप्रलयकारी त्सुनामी आला होता.  मार्च  2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या मोठा भूकंप आला होता. या भूकंपानंतर जपानला त्सुनामीने तडाखा दिला. या त्सुनामीमध्ये 19759 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली होती.  तर तेवढीच संख्येने लोक जखमी झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आणि किमान दोन अणुऊर्जा प्रकल्पांमधून किरणोत्सर्गी किरणोत्सर्गाचा धोका निर्माण झाला. अशा परिस्थितीत, जपानमध्ये ही भविष्यवाणी खूप गांभीर्याने घेतली जात आहे.

SOURCE : ZEE NEWS