Source :- ZEE NEWS

मार्क झुकेरबर्गची कंपनी मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करत असल्याची घोषणा केली आहे. मेटाने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही आमचा तृतीय-पक्ष तथ्य तपासणी कार्यक्रम बंद करत आहोत आणि सामुदायिक नोट्स मॉडेलकडे जात आहोत. त्याची सुरुवात अमेरिकेपासून होत आहे. मेटा म्हणते की हे मॉडेल इतर क्षेत्रांमध्ये विस्तारित केले जाईल. मात्र, यासाठी कोणतीही कालमर्यादा देण्यात आलेली नाही. 

एलॉन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लोकप्रिय केला त्याप्रमाणे कम्युनिटी नोट्स मॉडलप्रमाणे हे मॉडेल असणार आहे. मेटाचे चीफ ग्लोबल अफेअर्स ऑफिसर मेटा जोएल कॅपलान यांनी सांगितले की, हे बदल X प्लॅटफॉर्मवर यशस्वीपणे काम करताना पाहिले. यामध्ये ते आपल्या कम्युनिटीला अधिकार देतात की, त्यांना वाटत असलेल्या चुकीच्या पोस्ट किंवा दिशाभूल करणारी पोस्टबाबत निर्णय घेऊ शकतात. 

मार्क झुकेरबर्गने एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की मेटाने हा निर्णय घेतला आहे. कारण तज्ञ तथ्य तपासणी करणाऱ्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या काही कमतरता आहेत आणि ते एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला झुकू शकतात. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता कम्युनिटी नोट्स मॉडेलवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

एका व्हिडिओ मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग म्हणाले की, राजकीय पक्षपाताच्या चिंतेमुळे तथ्य-तपासकांना काढून टाकण्याचा मेटाचा निर्णय घेण्यात आला आहे. चुका कमी करण्यासाठी, आपली धोरणे सोपी करण्यासाठी आणि मुक्त अभिव्यक्तीचा पर्याय आपल्या व्यासपीठावर आणण्यासाठी कंपनी आपल्या मूळांकडे परत जात असल्याचे झुकेरबर्ग म्हणाले. हे बदल फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्सवर दिसतील.

मेटाच्या या निर्णयावर IFCN प्रमुख अँजी ड्रॉबनिक होलन यांचे वक्तव्यही समोर आले आहे. एंजीने सांगितले की या निर्णयामुळे सोशल मीडिया युझर्सना नुकसान होईल जे त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल निर्णय घेण्यासाठी आणि मित्र आणि कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी अचूक, विश्वासार्ह माहिती शोधत आहेत. 

अँजी पुढे म्हणाले की, नवीन प्रशासन आणि त्याच्या समर्थकांच्या अत्यंत राजकीय दबावादरम्यान हा निर्णय घेणे दुर्दैवी आहे. तथ्य तपासणारे त्यांच्या कामात पक्षपाती नसतात. ज्यांना कोणतेही खंडन किंवा विरोधाभास न करता खोटे बोलण्यापासून थांबवायचे नाही त्यांच्याकडून हा हल्ला झाला आहे.

SOURCE : ZEE NEWS