Source :- BBC INDIA NEWS
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
-
12 जानेवारी 2025
अपडेटेड 2 तासांपूर्वी
केरळमधील पथनमथिट्टामध्ये बलात्कार प्रकरणात पीडितेनं 30 पैकी सहा FIR मध्ये न्यायदंडाधिकाऱ्यासमोर तिचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या 45 वर पोहोचली आहे.
या प्रकरणात एकूण 59 जणांना आरोपी करण्यात आले आहे. यापूर्वी ही संख्या 64 असल्याचे सांगण्यात येत होते.
यातील दोन जण भारताबाहेर तर एक जण केरळबाहेर फरार आहे.
एका आरोपीला केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे, तर इतर 14 जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
बाल कल्याण समिती (CWC) चे अध्यक्ष आणि पथनमथिट्टा येथील वकील एन. राजीव यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “कायद्यानुसार पीडितेला प्रत्येक एफआयआरमध्ये दंडाधिकाऱ्यासमोर जबाब नोंदवावा लागेल. हे अनिवार्य असून प्रक्रियेचा भाग आहे.”
भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 183 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवले जाते. ते CrPC च्या कायद्याच्या कलम 164 प्रमाणे आहे.
एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, यापूर्वी पीडित मुलगी आजारी असल्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवू शकली नाही.
विशेष तपास पथक (SIT) स्थापन
यापूर्वी या प्रकरणात 28 आरोपींना अटक केल्यानंतर विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्यात आली होती.
पथनमथिट्टाचे पोलीस अधीक्षक व्हीजी विनोद कुमार यांना या एसआयटीचे प्रमुख बनवण्यात आलं आहे. तर त्यांच्यासोबत डीएसपी नंदकुमार एस यांनाही या एसआयटीमध्ये ठेवण्यात आलं आहे.
नंद कुमार हे या प्रकरणाचे तपास अधिकारी राहतील आणि इतक काही पोलीस निरीक्षक या पथकात असतील.
हे पथक तिरुअनंतपुरम रेंजच्या डीआयजी अजिता बेगम यांच्या हाताखाली काम करतील.
या प्रकरणी आरोपींमध्ये विद्यार्थिनीचे शेजारी, मित्र, तिच्या वडिलांचे मित्र, क्रीडा प्रशिक्षक आणि इतरांचा समावेश आहे.
यातील दोन आरोपी 17 वर्षे वयोगटातील अल्पवयीन आहेत, तर अन्य आरोपी 19 ते 47 वयोगटातील आहेत.
याप्रकरणी आतापर्यंत 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारी दोन पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
पहिला आरोपी मित्र
पथनमथिट्टा जिल्ह्याचे डेप्युटी एसपी नंदकुमार एस यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “एससी-एसटी कायदा आणि पॉक्सो अंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, कारण हे गुन्हे गेल्या पाच वर्षांत घडले आहेत. त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती.”
“गेल्या पाच वर्षांत मुलीवर तीन वेळा सामूहिक बलात्कार झाला आहे,” असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पीडित मुलीचा शेजारी आणि बालपणीच्या मित्राला या प्रकरणात पहिला आरोपी करण्यात आलं आहे. या मुलीवर तिच्या घराजवळच सामूहिक बलात्कार झाला, असा आरोप आहे.
सखी या महिला हक्क संघटनेनं या लैंगिक अत्याचाराचा वर्णन ‘निर्घृण’ असं केलं आहे.
या प्रकरणात तिच्या शेजारी राहणाऱ्या बालपणीच्या मित्राचं नाव पहिल्यांदा समोर आलं. विद्यार्थिनी 13 वर्षांची असताना त्यांच्यात मैत्री झाली होती.
एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “त्या मित्रानं आधी विद्यार्थिनीला नग्न छायाचित्रे आणि व्हीडिओ दाखवले होते. त्याच्या एका मित्राचे नावही एका प्रकरणात नोंदवलं गेलं आहे.”
पथनमथिट्टा जिल्हा गुन्हे शाखेच्या मीडिया सेलचे संजीव एम. यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “विद्यार्थिनीनं तिच्या वडिलांच्या फोनवर 40 लोकांच्या कॉलचे पुरावे दिले आहेत.”
“विद्यार्थिनीला धक्का बसला आहे,” असंही ते म्हणाले.
पीडित तरुणी दलित समुदायातील आहे. तीन ते चार वर्षांदरम्यान तिच्याबरोबर हा प्रकार घडल्याचं पीडित विद्यार्थिनीनं म्हटलं आहे.
आरोपींमध्ये शेजारी, वडिलांचे मित्र, क्रीडा प्रशिक्षक, मित्र आणि इतरांचा समावेश आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपींमध्ये दोन आरोपी 17 वर्षांचे अल्पवयीन आहेत, तर इतर आरोपी 19 ते 47 वयोगटातले आहेत.
या प्रकरणी आतापर्यंत 18 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, दोन पोलिस ठाण्यांत दोन तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
गेल्या चार-पाच वर्षांपासून अत्याचार झाल्यानं या काळाच तरुणी अल्पवयीन होती. त्यामुळं या प्रकरणी ॲट्रॉसिटी आणि पॉस्को कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पथनमथिट्टाचे पोलीस उपाधीक्षक नंदकुमार एस यांनी दिली आहे.
यात गँगरेपच्या तीन घटना घडल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणी पहिला आरोपी म्हणून तरुणीच्या बालमित्राचा उल्लेख आहे. तरुणी 13 वर्षांची असताना त्यानं तिच्यावर अत्याचार केला होता. गँगरेपच्या गुन्ह्यांतही त्याच्या नावाचा समावेश आहे.
आरोपांनुसार, विद्यार्थिनीवर तिच्या घराजवळ पहिल्यांदाच सामूहिक अत्याचार करण्यात आला होता.
पहिल्या आरोपीकडंं फोनमध्ये तरुणीच्या लैंगिक शोषणाबाबतचे काही पुरावे होते. त्याचा वापर करून तिला ब्लॅकमेल करून वारंवार शोषण केलं जात होतं.
तो तिला धाक दाखवून मित्रांकडे घेऊन जायचा असं पथनमथिट्टा जिल्हा गुन्हे शाखेच्या मीडिया सेलचे सजीव एम. यांनी बीबीसी हिंदीबरोबर बोलताना सांगितलं.
कुटुंबश्री ‘स्नेहिता’ उपक्रमाच्या निमित्ताने काही समुपदेशकांनी पीडितेच्या घरी भेट दिली, त्यावेळी समुपदेशकांमुळे हा प्रकार समोर आला.
महिला हक्क आणि अधिकारासाठी काम करणाऱ्या ‘सखी’ मंचाने हे धक्कादायक प्रकरण असल्याचं म्हटलंय.
पथनमथिट्टा जिल्हा गुन्हे शाखेच्या मीडिया सेलचे संजीव एम. यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, “विद्यार्थिनीने तिच्या वडिलांच्या फोनवर 40 जणांकडून आलेल्या कॉलचे पुरावे दिले.”
“विद्यार्थीनी जबर धक्क्यात आहे,” असं त्यांनी सांगितलं.
पीडित विद्यार्थीनीची प्रकृती ठीक नसल्यानं मॅजिस्ट्रेटसमोर तिचा जबाब अद्याप नोंदवता आलेला नाही.
पथनमथिट्टाच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट एन राजीव यांनी सांगितलं की, “या उपक्रमामध्ये विविध कुटुंबांची पूर्ण तपशीलवार माहिती गोळा केली जाते. तसंच त्यांच्या कुटुंबाच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी कुटुंबांचं समुपदेशन केलं जातं.
त्यावेळी पीडित विद्यार्थिनीनं तिच्या शालेय दिवसांच्या काळात आलेले अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हे सर्व समोर आलं.”
तरुणी सतत मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा हट्ट धरून होती. त्यामुळं समुपदेशकांनी थेट राजीव यांना संपर्क केला.
त्यानंतर पीडित तरुणी तिच्या आईसह बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी तरुणी मानसोपचार तज्ज्ञांशी बोलली. त्यावेळी तिची आई बाहेर बसलेली होती.
या तरुणीच्या आईला मुलीच्या वडिलांच्या फोनमधून माहिती मिळवण्यास सांगण्यात आलं होतं. त्यातून यामागे कोण आहे त्यांची नावं समोर आल्याचं राजीव म्हणाले.
सामान्यपणे बाल कल्याण समितीला अशा प्रकारच्या प्रकरणांत पोलिसांना माहिती द्यावी लागत असते. पण आम्हाला हे प्रकरण वेगळं असल्याचं जाणवलं. त्यामुळं आणि लगेचच पोलीस अधीक्षकांना माहिती दिली आणि तातडीने कारवाईला सुरुवात केली, असंही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगानं याप्रकरणी राज्य सरकारकडून तीन दिवसांत अहवाल मागवला आहे. तर केरळच्या महिला आयोगानंही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
पीडित तरुणी आणि तिच्या आईला सुरक्षित ठिकाणी संरक्षणात ठेवण्यात आलं आहे.
महिला हक्क संघटनेनं काय म्हटलं
महिला हक्क संघटना सखीच्या वकील संध्या जनार्दना पिल्लई बीबीसी हिंदीसोबत बोलताना म्हणाल्या, “या प्रकरणातून स्पष्टपणे दिसून येतंय की मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत. आणखी बऱ्याच गोष्टी करण्याची गरज आहे.”
संध्या पुढे बोलताना म्हणाल्या, “याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मुलांची सरक्षा करण्यात व्यवस्था अपयशी ठरली आहे. शिवाय, या प्रकरणात आहे, पीडिता गरीब अनुसूचित जातीच्या कुटुंबातून येते आणि ती सर्वात जास्त धोक्यात असलेल्या स्थितीत असते. सध्या तपास सुरू आहे. या प्रकरणात पुढे कसे जायचे, यावर आम्ही लवकरच निर्णय घेऊ”, असं त्या म्हणाल्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC