Home LATEST NEWS ताजी बातमी नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

5
0

Source :- BBC INDIA NEWS

नाना पाटेकर

Published

वाचन वेळ: 7 मिनिटे

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

वयाच्या 75 वर्षी गोव्यामध्ये त्यांचं निधन झालं आहे.

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमिट असा ठसा उमटवणारा अभिनेता अशी त्यांची ओळख राहिलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचं आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांच्या निवासस्थानी तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

बीबीसी मराठीने त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांच्याशी संवाद साधला. मल्हार पाटेकर बीबीसीशी बोलताना म्हणाले की, “ही दुर्दैवी बातमी खरी आहे.”

नाना पाटेकर यांच्यावर ‘शासकीय इतमामात’ अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं घेतल्याचं राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी जाहीर केलंय.

‘सलग 45 मिनिटं सीपीआर’; डॉक्टरांनी काय सांगितलं?

एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलंय की, “45 मिनिटे सलग सीपीआर देऊनही त्यांना वाचवता आलं नाही. याप्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केलं जाईल अशी माहिती मणिपाल हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.”

नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

‘पीटीआय’शी बोलताना डॉ. शेखर साळकर यांनी सांगितलं की, “आपले लाडके अभिनेते नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणलं असता ते मृत अवस्थेत होते आणि आज पहाटे 5 वाजून 20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पहाटे 4.18 किंवा 4.20 च्या सुमारास त्यांचे केअरटेकर आले. त्यांनी आमची रुग्णवाहिका घेतली आणि जवळच असलेल्या त्यांच्या फ्लॅटवर गेले. आमचे पथक तिथे पोहोचेपर्यंत ते जमिनीवर पडलेले होते, बेशुद्ध होते आणि कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हते.

“पथकाने सीपीआर सुरू केला आणि सीपीआर चालू ठेवतच त्यांना रुग्णालयात हलवले. त्यांना सुमारे 10 मिनिटांत इथं आणण्यात आलं आणि आम्ही इथंही सीपीआर सुरू ठेवला. परंतु, त्यांना मृत अवस्थेतच आणल्यासारखी स्थिती होती. त्यामुळे आम्हाला ‘मेडिको-लीगल केस’ (वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण) नोंदवावी लागली आणि आता मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आला आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आला होता, परंतु त्याचे नेमके कारण आम्हाला माहित नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ते हृदयविकाराचे रुग्ण होते आणि त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते,” असंही त्यांनी म्हटलं.

नाना पाटेकर

नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर असं आहे. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये तसेच नाटकांमध्येही अनेक भूमिका केल्या आहेत.

पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. नाना पाटेकर यांनी ‘गमन’ या 1978 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केलं होतं.

‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘अग्निसाक्षी’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली.

नानांच्या भूमिका पिढ्यानपिढ्या लक्षात राहतील- पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

त्यांनी म्हटलंय की, “नाना पाटेकर यांच्याकडे असलेली तीव्रता, वेगळेपण आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व फारच थोड्या अभिनेत्यांकडे होते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण अष्टपैलुत्व आणि सर्जनशीलता आणली; तसेच अशा काही भूमिका साकारल्या ज्या पिढ्यानपिढ्या लक्षात राहतील. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि रोखठोक मतांसाठीही ते ओळखले जात; आपल्या मनातील विचार मांडताना ते कधीच कचरत नसत.”

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील श्री नाना पाटेकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”

देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि नाना पाटेकर यांचं एक संग्रहित छायाचित्र

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं, “भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन ही कला क्षेत्रासाठी कधीही भरुन न येणारी हानी आहे. जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि दमदार संवादफेकीने प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला. गंभीर सामाजिक विषय असोत किंवा विनोदी भूमिका, त्यांनी साकारलेले प्रत्येक पात्र जिवंत वाटत असे.

‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची केलेली सेवा असो किंवा सीमेवर जाऊन जवानांचे मनोबल वाढवण्याचे कार्य असो, कीर्तीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही ते आपल्या मातीत घट्ट रुजलेले राहिले. त्यांच्याशी जेव्हा जेव्हा भेट झाली, तेव्हा त्यांचा साधेपणा आणि स्पष्टवक्तेपणा नेहमीच प्रभावित करून गेला.

ईश्वर शोकाकुल कुटुंबीयांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो तसेच दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणी स्थान देवो. ॐ शांती शांती शांती.”

ही अकाली एक्झिट मनाला मोठा धक्का देणारी- देवेंद्र फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, “ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.

देवेंद्र फडणवीस आणि नाना पाटेकर

“परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले.”

शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”

सामाजिक बांधिलकी जपणारा कलाकार गमावला- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाना पाटेकर यांना आदरांजली वाहताना म्हटलंय की, “ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले.”

“कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट छाप सदैव स्मरणात राहील.”

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नाना पाटेकर यांना आदरांजली वाहताना म्हटलंय की,

अभिनेता रितेश देशमुखनं म्हटलंय की, “कुटुंबीयांना, आप्तेष्टांना आणि लाखो चाहत्यांना माझी मनःपूर्वक सांत्वना. खरच आज एका युगाचा अस्त झाला आहे.”

दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटलंय की, “प्रिय नानाजी, तुमची खूप आठवण येतेय… आपण एकत्र घालवलेले क्षण, त्या गप्पा-गोष्टी, ती खडाजंगी, तुम्ही स्वतः बनवलेले जेवण आणि तुम्ही दिलेले ज्ञान – या सर्व गोष्टी मी नेहमीच जपून ठेवेन. माझ्या आयुष्याच्या प्रवासात तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदरांजली वाहताना म्हटलंय की, “भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे.”

नाना पाटेकर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहताना लिहिलंय की, “अभिनयाचा एक युगपुरुष हरपला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे.“

“नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे. कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील वंचित घटक आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्यही सदैव प्रेरणादायी राहील. आज अभिनयविश्वातील एक संवेदनशील मन, एक दमदार आवाज आणि एक अस्सल कलाकार हरपला आहे.“

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नाना पाटेकर यांना आदरांजली वाहताना म्हटलंय की, “कालच तर त्यांच्याशी बोललो होतो. मला उद्देशून त्यांचे शेवटचे शब्द होते – “काळजी घे, राजा”. नाना सर, पडद्यावर आणि पडद्याबाहेरही तुमची खूप आठवण येईल. सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. ओम शांती.”

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी एक्सवर आदरांजली व्यक्त करत म्हटलंय की, “पडद्यावरील अभिनयासोबतच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेले त्यांचं सामाजिक कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारं आहे.

कलेच्या माध्यमातून लाखो मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या महान कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!”

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही आदरांजली वाहताना म्हटलंय की, “ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे. उत्कृष्ट अभिनय, सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नाना पाटेकर सदैव आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.”

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी ‘करारी अभिनेता आपण गमावला !’ अशा शब्दात दु:ख व्यक्त केलं आहे.

नाना पाटेकर

त्यांनी म्हटलंय की, “आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका जिवंत करणाऱ्या नानांनी रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, करारी, प्रतिभावान आणि अस्सल कलावंत गमावला आहे. महाराष्ट्र शासनानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2013 पुरस्कारासह चित्रपट क्षेत्रातील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. मध्यमवर्गीय कामगार मराठी कुटुंबातून पुढे आलेल्या नाना पाटेकर यांनी अपार मेहनत व आपल्या वेगळ्या शैलीने अभिनयात ठसा उमटवला. आमच्या गिरणगावातील एक अस्सल, इरसाल, उत्सव प्रेमी मराठी माणूस आम्ही आज गमावला आहे.”

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय की, “भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी धक्कादायक आहे. भारदस्त आवाज, भेदक डोळे आणि टोकदार संवादफेकीच्या जोरावर नाना पाटेकर यांनी अनेक दशके चित्रपटसृष्टीवर आणि रसिक प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी मोठे काम उभे केले आहे. समाज स्पंदने जपणारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी तळमळ असणारा संवेदनशील मनाचा अभिनेता आज आपण गमावला. नानांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC