Home LATEST NEWS ताजी बातमी नेपाळ पूर : आधी रंगीबेरंगी घरं, आता चिखल-दगडांचा ढिगारा; 10 फोटोंमधून दिसलं...

नेपाळ पूर : आधी रंगीबेरंगी घरं, आता चिखल-दगडांचा ढिगारा; 10 फोटोंमधून दिसलं विनाशाचं भयंकर चित्र

5
0

Source :- BBC INDIA NEWS

नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरामुळे आणि भूस्खलनामुळे अनेक गावं, रस्ते, पूल आणि इमारती अक्षरशः मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत.

फोटो स्रोत, PM Secretariat/Reuters

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरामुळे आणि भूस्खलनामुळे अनेक गावं, रस्ते, पूल आणि इमारती अक्षरशः मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीपर्यंत ज्या भागात घरं, बाजारपेठा आणि जलविद्युत प्रकल्प गजबजलेले दिसत होते, तिथे आता चिखल, पाणी आणि दगडांचा खच दिसत आहे.

पूर येण्यापूर्वी 1 जुलै रोजी दिसणारा नेपाळमधील तिमुरे परिसर.

फोटो स्रोत, Reuters

विनाशकारी पुरामुळे नेपाळमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. पण त्याचबरोबर, मृतांचा आणि बेपत्ता लोकांचा आकडाही वाढताना दिसत आहे.

पूर आल्यानंतर शुक्रवारी (28 ऑगस्ट) याच परिसरातील हे छायाचित्र.

फोटो स्रोत, Reuters

नेपाळच्या आपत्ती निवारण विभागानुसार, आतापर्यंत 626 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 2 हजार 426 लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

एप्रिल 2024 मध्ये रसुवागढी जलविद्युत प्रकल्प आणि त्रिशूली नदीचे हे छायाचित्र.

फोटो स्रोत, Reuters

त्रिशूली नदीवर असलेला रसुवागढी जलविद्युत प्रकल्प काही दिवसांपूर्वीपर्यंत गजबजलेला औद्योगिक परिसर होता. पण, आता वरून पाहिल्यावर या प्रकल्पाचे जवळपास कोणतेही चिन्ह तिथे दिसत नाही.

एप्रिल 2024 मध्ये रसुवागढी जलविद्युत प्रकल्प आणि त्रिशूली नदीचे हे छायाचित्र.

रसुवागढी जलविद्युत प्रकल्पाच्या परिसराचेच हे छायाचित्र शुक्रवारी (28 ऑगस्ट) घेण्यात आले आहे. या छायाचित्रात त्या ठिकाणी आता काहीही शिल्लक राहिलेलं दिसत नाही.

फोटो स्रोत, Reuters

साधारण 4 हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या भीषण पुरानंतर रंगीबेरंगी घरांवर चिखल साचला आहे. ड्रोनमधून हे दृश्य घेतलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

पूर येण्यापूर्वी आणि पूर आल्यानंतरची छायाचित्रे पाहिल्यास अनेक शहरं आणि गावांचं झालेलं मोठं नुकसान स्पष्टपणे दिसून येतं.

ही छायाचित्रं नेपाळमध्ये पुरानं किती मोठी हानी केली, याची झलक दाखवतात.

या भीषण पुराच्या पाण्यात चिखल आणि मोठमोठ्या दगडांचा मोठा लोंढा वाहत आला. या भीषण घटनेनंतर एक व्यक्ती नुकसान झालेल्या घराजवळून जाताना.

फोटो स्रोत, Reuters

या भीषण पुराच्या पाण्यात चिखल आणि मोठमोठ्या दगडांचा मोठा लोंढा वाहत आला. यात अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे.

अनेक घरं वाहून गेली आहेत. जी घरं पाण्याच्या आणि चिखलाच्या प्रवाहात टिकून राहिलीत त्यांची अवस्था अशी झाली आहे.

या भीषण घटनेनंतर एक व्यक्ती नुकसान झालेल्या घराजवळून जाताना.

ड्रोनमधून दिसणाऱ्या दृश्यात देवीघाटमधील चिखलामध्ये पूर्णपणे झाकून गेलेली घरं आणि तुटलेला पूलही दिसत आहे.

फोटो स्रोत, Reuters

गेल्या महिन्यात घेतलेल्या सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये नेपाळच्या तिमुरे भागात नदीकाठी रंगीबेरंगी इमारती दिसत होत्या. परंतु, आता या ठिकाणी मोजक्याच इमारती शिल्लक राहिल्या आहेत.

संपूर्ण परिसर चिखल, पाणी आणि मोठ्या दगडांनी जवळपास पूर्णपणे झाकून गेला आहे.

पुरामुळे उद्धवस्त झालेला परिसर हतबलपणे पाहत उभे असलेले 2 व्यक्ती.

फोटो स्रोत, Reuters

पुरामुळे उद्धवस्त झालेला परिसर हतबलपणे पाहत उभे असलेले 2 व्यक्ती.

वरील छायाचित्रात चीनचे बचाव पथक चिखल आणि इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, CCTV

या पुराचा फटका चीनलाही बसला आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या नव्या व्हीडिओत तिबेटच्या बाजूचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते.

बचाव पथकातील सदस्य चिखल आणि दगडांनी भरलेल्या उजाड परिसरात ‘कोणी आहे का?’ अशी हाक मारत लोकांचा शोध घेताना दिसत आहेत.

वरील छायाचित्रात चीनचे बचाव पथक चिखल आणि इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेताना दिसत आहेत.

चीनकडून तिबेटच्या बाजूला शोधमोहीम वेगात सुरू आहे.

फोटो स्रोत, CCTV

चीनकडून तिबेटच्या बाजूला शोधमोहीम वेगात सुरू आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC