Home LATEST NEWS ताजी बातमी परभणीच्या यशवाडीत मंदिराचा गाभारा कोसळून 5 भाविकांचा मृत्यू, 16 जखमी

परभणीच्या यशवाडीत मंदिराचा गाभारा कोसळून 5 भाविकांचा मृत्यू, 16 जखमी

5
0

Source :- BBC INDIA NEWS

परभणीच्या यशवाडीत मंदिराचा गाभारा कोसळून 5 भाविकांचा मृत्यू, 16 जखमी

फोटो स्रोत, Amol Sudhakarrao Langar

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

परभणी ते मानवत या रस्त्यावरील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील मंदिराचा गाभारा कोसळून 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेत 16 भाविक जखमी झाले असून दोन जण अत्यवस्थ आहेत.

जखमी भाविकांना घटनास्थळापासून जवळच असलेल्या आर.पी. वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना आज (20 जून) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

यशवाडीत मंदिराचा गाभारा कोसळून 5 भाविकांचा मृत्यू

फोटो स्रोत, Amol Lagnar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून मृत्यू झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

या घटनेनंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी, “ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेनंतर दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.” अशी माहिती दिली आहे.

यशवाडी

फोटो स्रोत, Amol Lagnar

जिल्हा प्रशासनाकडून मृतांची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

1. संतोष गडदे (पांगरा)

2. आकाश सुरदोसे (गंगाखेड रोड परभणी)

3. नुमेश अग्रवाल (जिंतूर)

4. सुरज कोपरटकर (इटाळी)

5. श्रीकृष्ण बलभीम गवारे (चिंचवडगाव तालुका वडवणी)

यांचा समावेश आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत जाहीर

परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मृतांच्या नातेवाईकांप्रति संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या निर्माणकार्य सुरू असलेल्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहेत. स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी असून मदत आणि बचावकार्य सुद्धा वेगाने सुरू आहे.”

यशवाडी

फोटो स्रोत, Amol Lagnar

यशवाडी येथील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, “महाराष्ट्रातील परभणी येथील मंदिरात घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. घटनेतील जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करेन.”

नेमकं काय घडलं?

माहितीनुसार, या मंदिराच्या गाभार्‍याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या गाभार्‍याच्या बांधकामात दगडांचा वापर होत होता.

दरम्यान, आज शनिवार रोजी या मंदिरात भाविकांची दर्शनाकरीता मोठी गर्दी उसळली. त्यावेळी गाभार्‍याचा काही भाग कोसळून भाविक त्याखाली दाबले गेले.

यशवाडी

फोटो स्रोत, Amol Lagnar

ही बातमी सतत अपडेट होत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC