Source :- ZEE NEWS

बलुचिस्तान आपल्या स्वातंत्र्याचा लढा लढत आहे. दोन दिवसांपूर्वी बलोच नेत्यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणाही केली आहे. मात्र, या लढ्यात सध्या चर्चा सुरू आहे बलुचिस्तानमधील हिंगलाज मातेची. कारण या हिंगलाज मातेच्या जयघोषानेच बलूच जनतेचा स्वातंत्र्याला लढा सुरू आहे. कारण बलुचिस्तानच्या नागरिकांची इथल्या हिंगलाज मातेवर मोठी श्रद्धा आहे.

स्वतंत्र बलुचिस्तान, हिंगलाज मातेचं वरदान

बलुचिनस्तानमध्ये जय हिंगलाज माता

बलुचिस्तान, मागील अनेक दशकांपासून स्वतंत्र देशाची मागणी करणारा हा प्रदेश. मात्र, याच बलुचिस्तानवर हिंगलाज मातेचा आशीर्वाद आहे. बलुचिस्तानमधील हिंगोल नदीच्या  किनाऱ्याजवळ असलेल्या गुहेत  हिंगलाज मातेचं मंदिर असून या मंदिराला बलुचिस्तानमध्ये विशेष महत्त्व आहे. 78 वर्षांपासून बलुचिस्तान आपल्या न्याय, हक्कासाठी पाकिस्तानसोबत लढत आहे. भारतानं पाकिस्तानला वारंवार धूळ चारली आहे. त्याचप्रमाणे बलुचिस्ताननं देखील पाकिस्तानला वेळोवेळी मात दिली आहे. पाकिस्तान विरोधातल्या याच लढाईत बलुचिस्तानला हिंगलाज मातेचं वरदान मिळाल्याचं अनेक बलोच लोक सांगतात.  कारण इथल्या हिंगलाज मातेवर या बलोच नागरिकांची मोठी श्रद्धा आहे. मोठ्या आस्थेनं बलुचिस्तानमध्ये हिंगलाज मातेला पुजलं जातं. 

– बलुचिस्तानच्या लासबेला जिल्ह्यातील कुंड मलिर भागात हे प्राचीन मंदिर आहे.

– बलुचिस्तानमधील हिंगलाज मातेचं हे मंदिरं शक्तीपीठ वैष्णो देवी नावाने प्रसिद्ध आहे

– बलुचिस्तान, पाकिस्तानमधील हिंदू बांधवांच्या आस्थेचं केंद्र आहे

– तसंच अनेक बलोच आणि मुस्लीम नागरिकही हिंगलाज मातेच्या मंदिरात सेवेसाठी येतात

– बलुचिस्तानमधील हिंगलाज मातेचं मंदिर हे जगातील पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे

हिंगलाज मातेच्या मंदिराचं वर्णन शिवपुराणमध्ये देखील आहे. त्रेतायुगापासून द्वापर युगाच्या ग्रंथांमध्ये या मंदिराचं वर्णन आहे. त्रेयायुगात भगवान श्रीरामांचे वशंज तसंच मध्ययुगात गुरू गोरखनाथ आणि गुरूनानक हे देखील या मंदिरात येऊन गेल्यांचा संदर्भ आढळून येतो तसंच बलुचिस्तानमधील चारण कबीला जातीचे लोक या हिंगलाज देवीला कुलदेवी मानतात..

बलुचिस्तानचं महाराष्ट्रासोबत देखील मोठं कनेक्शन आहे. अनेक मराठा बलुचिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत. 

बलुचिस्तानचं महाराष्ट्राशी नातं – 

– बलुचिस्तानचं महाराष्ट्रासोबत मोठं नातं आहे

– पानिपतच्या लढाईत अहमदशाह अब्दालीनं मराठ्यांचा पराभव केला होता

– या युद्धानंतर अब्दालीच्या सैनिकांनी 22 हजार मराठा सैनिकांना युद्धकैदी केलं होतं

– 22 मराठा सैनिकांना घेऊन अब्दाली हा अफगाणिस्तानच्या दिशेनं निघाला होता

– या युद्धात बलुचिस्तानमधील मीर नसीर खाननं अब्दालीला मदत केली होती

– त्यामुळे अब्दालीनं मीर नसीर खानला मराठा कैद केलेले मराठा सैनिक भेट दिलेत

– 1994 मध्ये मीर नसीर खानच्या गुलामगिरीतून मराठा सैनिक मुक्त झालेत

– बलुचिस्तानमधल्या मराठ्यांना बुगटी मराठा म्हणून ओळखलं जातं. यातील साहू मराठा हे शेतीत पारंगत होते

– साहू मराठे धर्मानं मुस्लीम बनले मात्र, महाराष्ट्राची परंपरा ते विसरले नाहीत, ते आजही मराठी
संस्कृती जपतात 

– साहू मराठे हे हिंगलाज मातेची देखील मोठ्या भक्ती भावानं पूजा करतात

दरम्यान बलुचिस्तानमध्ये राहणारी आजची जी बलूच कबीला जात आहे. त्यांचा इतिहास सिंधू संस्कृतीपेक्षाही जुना आहे. आजचा बलुचिस्तान हा गांधार प्रांताचा भाग होता. या गांधार प्रांताची राजकुमारी ही गांधारी असल्याचं देखील बलोच लोग सांगतात. त्यामुळे बलुचिस्ताननं आपल्या स्वांतत्र्याच्या लढ्यात जय मातादीचा नारा दिलाय…

SOURCE : ZEE NEWS