Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, ANI
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे
बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर एका प्रशिक्षणार्थी विमानाला सरावादरम्यान अपघात झाला आहे.
व्हीटी-एसईएक्स हे सेसना प्रकारचं विमान इथे एक खासगी प्रशिक्षण संस्था सरावासाठी वापरते. सरावादरम्यान हे विमान रनवेवरून खाली घसरल्याची माहिती मिळते आहे.
स्थानिक वेळेनुसार, दुपारी 12 वाजून 9 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. त्यात कुणी दुखापतग्रस्त झाल्याचं वृत्त नाही.
याच विमानतळावर उतरताना महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला 28 जानेवारी 2026 रोजी अपघात झाला होता, ज्यात त्यांचं निधन झालं होतं.
बारामती विमानतळावर आज काय घडलं?
IANS या वृत्तसेवा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, व्हीटी-एसईएक्स या विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंद्रे हे दोघे प्रवास करत होते.
विमानात सर्किट आणि लँडिंगच्या आपत्कालीन परिस्थितीचा सराव सुरू होता. याचदरम्यान, रनवे 29 वर उतरल्यानंतर विमान पूर्णपणे थांबू शकले नाही. विमान रनवेच्या शेवटच्या भागाच्या पुढे गेले आणि बाहेर फेकलं गेलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं, “व्हीटी-एसईएक्स विमान प्रशिक्षणाच्या सरावादरम्यान बारामती एअरफिल्डवरील रनवेवरून बाहेर गेले. विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंद्रे हे दोघे होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




