Source :- ZEE NEWS

India Pakistan War : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून सीमाभागात लष्करी कारवाईसाठीची तयारी करत सैन्यदलांना सज्ज केलं जात असतानाच पाकिस्तानमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्तानचा थरकाप उडत असतानाच तिथं पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पळ काढल्याचं वृत्त समोर आलं आहे. शेजारी राष्ट्रात तणावाची परिस्थिती वाढली असून आता लष्कर आणि देशातील सरकारमध्येत मतभेद असल्यानं आता पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आयएसआय या देशातील गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना एनएसएच्या पदी नियुक्त केल्याचं म्हटलं जात आहे. (Pakistan Army Chief Asim Munir )

पाकिस्तानात बंडखोरी आणि इतर कैक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागत असल्याची वस्तूस्थिती आहे. तर, भारतात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालय करणार असून आता पाकचं समर्थन असणाऱ्या या भ्याड हल्ल्यांचं उत्तर भारत नेमका कसा देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

जनरल आसिम मुनीर संकटात, नेमके गेले तरी कुठे? 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर (Pakistan Army Chief) सध्या त्यांच्याच देशात अनेक अडचणींचा सामना करताना दिसत असून त्यांनी पलायन केल्यानं पाक सरकारनं गुरुवारी रात्री उशिरा आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्त केलं. पहलगाम हल्ल्यानंतर आता पाकच्या मुनीर यांनी नेमका देशच सोडला का? हा प्रश्न सर्वच स्तरांतून उपस्थित केला जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार भारताकडून कठोर कारवाईच्या दृष्टीनं पावलं उचलली जात असली तरीही मुनीर मात्र कोणतीही प्रत्युत्तराची कृती करताना दिसत नाहीयेत. त्यामुळं एकतर त्यानी देश सोडला असावा किंवा रावळपिंडीतील एखाद्या बंकरमध्ये त्यांनी आसरा घेतला असावा असा कयास सध्या लावसा जात आहे. 

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा कुठेही पत्ता लागत नसल्याची बाब सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि इथं #MunirOut हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. पाकिस्तानच सरकारच्या कानांवर जेव्हा ही बातमी पडली तेव्हा त्यांनी तातडीनं या गोंधळात सारवासारव करण्याच्या हेतूनं एक पोस्ट करत 26 एप्रिल रोजी पाकच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुनीर सहभागी झाल्याचा एक फोटो प्रसिद्ध केला. पण, तरीही मुनीर यांचा कुठेही थांगपत्ता नसल्यानं आता देशाच्या संरक्षणाची धुरा आयएसआयप्रमुखांवर सोपवण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. 

SOURCE : ZEE NEWS