Home LATEST NEWS ताजी बातमी ‘महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी सोडून दिल्याची संशयिताची कबुली’

‘महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी सोडून दिल्याची संशयिताची कबुली’

5
0

Source :- BBC INDIA NEWS

एलिझाबेथ-जेन रॉस यांचा एक फोटो. हा फोटो 2015 मध्ये काढलेला असावा असे दिसते.

फोटो स्रोत, Facebook

एका व्यक्तीने एका 38 वर्षीय महिलेची हत्या करून तिला सुटकेसमध्ये भरले आणि तिला एका निर्जन स्थळी सोडून दिले. अशी कबुली संशयिताने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून ओसाड ठिकाणी असलेल्या इमारतीजवळ ती सुटकेस ठेवून देण्यात आल्याची कबुली एका व्यक्तीने ग्रीक पोलिसांनी दिली. ही महिला स्कॉटिश आहे.

38 वर्षीय एलिजाबेथ जेन रॉस (लिसा) यांचा मृतदेह 18 जुलै रोजी अथेन्समधील किप्सेली भागात आता त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार काही दिवसांआधी नोंदवण्यात आली होती.

26 वर्षीय अफगाणिस्तानी तरुणाला अटक

अथेन्समधील स्थानिक अधिकाऱ्यांनी अमेरिका, युनायटेड किंगडम आणि स्कॉटलँडमधील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तपास सुरू केला आहे. त्यानंतर पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आणि तो व्यक्ती अफगाणिस्तानचा असल्याचे समजते.

सुरक्षा दलांनी सांगितले की त्याला गुरुवारी पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. त्यावेळी त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.

संबंधित तरुणाला सदोष मनुष्यवध, दरोडा, हत्यार बाळगणे या गुन्ह्यांच्या संशयात अटक करण्यात आली होती. पण ग्रीक न्याय प्रणालीनुसार अद्याप कोणती कलमे लावली लागली आहेत हे निश्चित होणे बाकी आहे.

लिसाचा मृतदेह अथेन्सच्या किप्सेली जिल्ह्यातील एका ओसाड इमारतीत सापडला.

फोटो स्रोत, Reuters

पोलिसांनी सांगितले रॉस (लिसा – त्यांचे कुटुंबीय त्यांना लिसा म्हणतात) या ग्रीसमध्ये 26 जून रोजी पोहोचल्या आणि पिरायस भागात 10 जुलैपर्यंत थांबल्या. नंतर त्या अ‍ॅटिकातील एका अज्ञात स्थळाकडे निघाल्या.

व्हीडिओ फुटेजच्या विश्लेषणातून आणि तपासानंतर पोलिसांना या केसशी संबंध असलेल्या तरुणाची ओळख पटली.

त्या तरुणाने त्या महिलेचे बँक कार्ड्स तिच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी वापरले. त्या आधी त्याने तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी सोडून दिला.

पोलिसांकडून एक खोटं पिस्तुल आणि चाकू जप्त

पोलिसांनी या तरुणाच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना एक खोटं पिस्तुल आणि चाकू सापडला. पोलिसांनी या गोष्टी जप्त केल्या आहेत.

लिसा सुरुवातीला केरातसिनी या भागात त्यांच्या ग्रीक स्नेहींसोबत राहत होत्या. हा भाग मध्यवर्ती अथेन्स शहरापासून साडे नऊ किमी दूर आहे.

त्यांनी सांगितले की 15 जुलै रोजी त्या किप्सेली भागात राहणाऱ्या ‘अमेरिकन मित्र परिवारा’कडे किंवा परिचितांकडे जाणार आहे.

शनिवारी ग्रीक पोलिसांनी सांगितले की टॉक्सिकॉलॉजी अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजेल. हा अहवाल लवकर यावा यावर पोलिसांचे लक्ष आहे. येत्या काही दिवसांत हा अहवाल मिळेल, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हा अहवाल येण्यासाठी काही आठवड्यांपासून ते काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. प्रयोगशाळेतील काम आणि प्रकरणाच्या गुंतागुंतीवर चाचण्यांचा निकाल अवलंबून आहे.

जिथे लिसाचा मृतदेह सापडला तो किप्सेली येथील इमारतीचा बाह्य भाग

फोटो स्रोत, Reuters

किप्सेली भागातील लिसा यांचे अमेरिकन मित्र-मैत्रिणी कोण होते याचा पोलीस शोध घेत आहेत.

स्कॉटलँडचे प्रथम मंत्री जॉन स्विनी यांनी या प्रकरणाला पूर्णतः धक्कादायक संबोधले आहे.

स्कॉटलँड सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, एलिजाबेथ जेन रोज यांच्या कुटुंबीयांसाठी हा अतिशय दुःखद प्रसंग आहे. चौकशी सुरू असताना या कुटुंबाच्या ‘प्रायव्हसी’चा आदर करणे आवश्यक आहे.

स्कॉटलँड प्रशासनातील अधिकारी कुटुंबाच्या संपर्कात आहेत तसेच परराष्ट्र खाते, कॉमनवेल्थ आणि विकास कार्यालय यांच्या संपर्कात आहे. लिसा यांच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळेल.

हे प्रकरण सध्या स्कॉटलँड पोलिसांच्या अंतर्गत आहे त्यामुळे यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही असे प्रवक्त्यांनी सांगितले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC