Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Alpesh Karkare
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले आहे. पहिल्याच पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी जमा झाल्याचे दिसत आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार 23 जून रोजी पाऊस पडला.
यामुळे तापामानात काहीशी घट झाली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर, येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
फोटो स्रोत, Alpesh Karkare
अंधेरी सबवे, हिंदमाता, सायन-माटुंगा या परिसरात पाणी तुंबले. शहरात अनेक ठिकाणी पाणी जमा झाल्याने लोकल सेवा आणि वाहतूक प्रभावित झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी मुंबई आणि राज्यातील इतर भागात मान्सून आल्याची घोषणा केली.
हवामान विभागाने मुंबई आणि परिसरासाठी पुढील 24 तासांकरिता ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
फोटो स्रोत, Alpesh Karkare
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 24 ते 27 जून दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून उत्तर कोकणातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
फोटो स्रोत, @mybmc
दरम्यान, पॅसिफिक महासागरात फिलिपिन्सच्या समुद्रात टायफून म्हणजे मेखला हे चक्रीवादळ घोंघावतंय.
हे चक्रीवादळ उत्तरेला जपानकडे सरकण्याची शक्यता असल्याचं जपानच्या हवामानखात्यानं म्हटलं आहे.
या चक्रीवादळापासून भारताला कुठला धोका नाहीये, पण काहीवेळा या प्रदेशातल्या वादळांचा जेट स्ट्रीमवर आणि मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या वादळांवर नजर ठेवणं महत्त्वाचं ठरतं.
फोटो स्रोत, @RMC_Mumbai
दरम्यान, राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद होत असली तरी, बहुतांश भागात हवामान कोरडे आहे. यावर्षी 6 जून रोजी कोकण प्रदेशात मान्सूनचे आगमन झाले.
साधारणपणे, मान्सून 15 ते 20 जूनच्या सुमारास राज्याच्या बहुतांश भागात पोहोचतो. परंतु, यावर्षी, जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पातळीवर पावसाची नोंद झालेली नाही.
मात्र, 21 जूनपासून हवामानाचे स्वरूप बदलत असून, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




