Source :- BBC INDIA NEWS
मूत्राशय नाही, वाढ खुंटली तरी तिने हार नाही मानली
27 मिनिटांपूर्वी
नागपूरची अबोली जरीत म्हणजे मूर्ती छोटी आणि किर्ती महान याचं जिवंत उदाहरण आहे. अबोली छोटीशी दिसत असली तरी तिचं वय 21 वर्ष आहे. तिने लहानपणापासून मूत्रसंस्थेशी संबंधित गंभीर आजाराचा सामना केला आहे.
जन्मतः तिला मूत्राशय नव्हतं. जसजशी ती मोठी होत गेली तसं तिला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला.
इतकंच नाही तर सामाजिक भेदाविरोधातही तिला लढावं लागलं. तिच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आता तिला डायलेसिस घेण्यातही अडचणी येत आहेत. पण आहे त्या परिस्थितीला ती हसतमुख सामोरं जातेय.
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- हेमंत एकरे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC