Source :- ZEE NEWS
World Most Expensive Airport: जगभरात विविध देशांमध्ये नविन विमानतळांची निर्मीती केली जात आहे. अशातच जगात सर्वात मोठ्या एअरपोर्टची निर्मीती केली जात आहे. या एअरपोर्टचा आकार पाहिला असता संपूर्ण मुंबई शहर यात सामावेल इतका मोठा आहे. या एअरपोर्ट तब्बल 400 टर्मिनल गेट असणार आहेत. 28 कोटी प्रवासी या विमानतळावरुन प्रवास करतील. या एअरपोर्टवर कुणी हरवलं तर सापडणं मुश्किल आहे. हे जगातील सर्वात मोठे नाही तर महागडे विमानतळ असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या देशात तयार होत आहे हे जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट.
जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या देशात नाही तर दुबईत तयार होत आहे. दुबई हे लक्झरीयस लाईफ स्टाईलसाठी ओळखले जाते. जगातील सर्वात महागड्या वस्तू दुबईत पहायला मिळतात. अशातच जगातील सर्वात महागडे आणि सर्वात मोठे एअरपोर्ट देखील दुबईतच तयार केले जात आहे.
UAE दुबई येथे जगातील सर्वात मोठे विमानतळ तयार करण्यात आले आहे. जगातील हे सर्वात मोठे विमानतळ सौदी अरेबियातील दमाम (Dammam) येथे आहे. अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ (Al Maktoum International Airport) हे जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. या विमानतळावर 400 टर्मिनल गेट असणार आहेत.
हे नविन विमानतळ दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा 5 पटीने मोठे आहे. या विमानतळावर दरवर्षी 26 कोटी प्रवासी प्रवास करू शकतात. अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 समांतर धावपट्टी आहेत. येथे 5 विमाने एकाच वेळी टेक ऑफ तसेच लँड करू शकतात.
या विमानतळाच्या बांधकामासाठी 35 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे ₹ 30,05,27,32,50,000 इतका खर्च आला आहे. यूएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी दुबईच्या गरजा लक्षात घेऊन त्याच्या बांधकामाचे आदेश दिले आहेत.
हे विमानतळ उभारण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागणार आहे. हे विमानतळ सुरू झाल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाजही या विमानतळावर हस्तांतरित करण्यात येणार आहे.
दुबईच्या या नव्या विमानतळाभोवती संपूर्ण शहर बांधले जाणार आहे. यासह 10 लाख लोकांच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे कामही पूर्ण होणार आहे. हे विमानतळ केवळ सर्वात मोठा नाही तर सर्वात महागड्या विमानतळांपैकी एक असेल.
SOURCE : ZEE NEWS