Home LATEST NEWS ताजी बातमी राज्यात पावसाचा जोर कायम, ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पावसाचा जोर कायम, ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

5
0

Source :- BBC INDIA NEWS

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर तसेच दक्षिण कोकण-गोवा भागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

9 ते 13 ऑगस्टदरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच दक्षिण कोकण-गोवा भागातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांना पावसासह वादळी वाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे कोणता अलर्ट

विदर्भात पावसाचा जोर अजून कायम आहे. गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

तर, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावलाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

तर उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट असून काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात पुढील 6 दिवस हवामान कसे असेल?

महाराष्ट्रात पुढील 6 दिवस पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

9 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस होऊ शकतो.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान

फोटो स्रोत, @RMC_Mumbai

10 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

मात्र या दिवसासाठी कोणताही स्वतंत्र हवामान इशारा देण्यात आलेला नाही.

11 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

12 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वादळाचा प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

13 ऑगस्ट

पावसाचा जोर मुख्यतः कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

14 ऑगस्ट

आठवड्याच्या अखेरीसही कोकण-गोव्यातील बहुतांश भागात पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC