Source :- ZEE NEWS
Lufthansa plane flies without pilot: विमान चालवणे हे गाडी किंवा बाईक चालवण्याएवढे सोपे काम नाही. याशिवाय विमान चालवताना एक छोटी चूक घडली तरी शेकडो लोकांचे प्राण त्यात जाऊ शकतात. कोणतेही वाहन चालवताना चालकाच्या छोट्याशा चुकीमुळे अनेक अपघात होतात. आज आम्ही तुम्ही अशी एक बातमी सांगणार आहोत जी वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. जर्मनीहून स्पेनला जाणारे एक विमान पायलटशिवाय 10 मिनिटे हवेत उडत राहिले. ज्या वेळी हे घडले तेव्हा विमानात 200 प्रवासी होते. याशिवाय जर्मन वृत्तसंस्था डीपीएने शनिवारी वृत्त दिले सांगितले की, त्या विमानाचा सह-वैमानिक बेशुद्ध पडला होता.
नक्की काय झालं?
17 फेब्रुवारी 2024 रोजी फ्रँकफर्टहून सेव्हिल, स्पेनला जाणाऱ्या विमानादरम्यान एक घटना घडली. अहवालानुसार, लुफ्थांसाचे एअरबस ए321 हे विमान 10 मिनिटे पायलटशिवाय उडाले कारण पहिला अधिकारी (फस्ट ऑफिसर) बेशुद्ध पडला होता आणि कॅप्टन वॉशरूममध्ये होता. जेव्हा कॅप्टन वॉशरूम वापरून कॉकपिटमध्ये परत येण्यासाठी आला तेव्हा त्याला आतमध्ये जातच आले नाही. तो त्यावेळी सुरक्षा दरवाजासाठी प्रवेश कोड टाकत होता. त्यावेळी कॅप्टन घाबरला आणि त्याने इंटरकॉमद्वारे कॉकपिटमध्ये फोन केला, पण त्याला काहीही उत्तर मिळाले नाही. यानंतर कॅप्टनने गेट उघडण्यासाठी इमर्जन्सी कोड टाकला. यावेळी सह-वैमानिक शुद्धीवर आला आणि त्याने आतून स्वतः दरवाजा उघडला. त्यावेळी सह-वैमानिक लाल पडला होता. याशिवाय त्याला घाम फुटला होता आणि तो अस्ताव्यस्त हालचाल करत होता. हे बघून लगेचच कॅप्टनने केबिन क्रूला मदत मागितली. त्यानंतर कॅप्टनने माद्रिदमध्ये अनियोजित लँडिंग करण्याचा निर्णय घेतला, आणि या पायलटला रुग्णालयात नेण्यात आले.
हे ही वाचा: पायलटला आकाशात मार्ग कसा समजतो? जाणून घ्या
अहवालानुसार, 199 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स असलेले हे विमान सुमारे 10 मिनिटे विमानाच्या कमांडिंगमध्ये असलेल्या पायलटशिवाय उड्डाण करत होते.
10 मिनिटे पायलटशिवाय कसं उडाले विमान?
जेव्हा पहिला अधिकारी शिवाय विमान 10 मिनिटे उडत होते तेव्हा कोणतीही वाईट घटना नाही घडली. याचे कारण होते ऑटोपायलट. ऑटोपायलट मोड सुरु असल्यामुळे विमान स्थिरपणे उड्डाण करत राहू शकले. या कालावधीत, व्हॉइस रेकॉर्डरने कॉकपिटमध्ये विचित्र आवाज रेकॉर्ड केले जे त्याच्या आरोग्याशी निगडित होते, असे डीपीएने माहिती दिली.
हे ही वाचा: गावातलं ग्रीन वंडर! बाभळीच्या झाडावर उभारलेलं अनोखं ट्री हाऊस, आतील दृश्य पाहून चाटच पडाल
नक्की काय झाले होते?
स्पॅनिश विमान वाहतूक तपासकर्त्यांच्या अहवालात असे दिसून आले आहे की सह-वैमानिकाला हृदयविकाराचा त्रास होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यानंतर त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले.
SOURCE : ZEE NEWS