Source :- ZEE NEWS
US Airways Flight 1549: 12 जून 2025 रोजी भारतात एक भयानक अपघात घडला. गुजरातमध्ये अहमदाबाद येथे लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर काही वेळातच क्रॅश झाले. यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, फक्त एक प्रवासी बचवला. 16 वर्षापूर्वी अमेरिकेत एक भयानक रेल्वे अपघात झाला होता. मात्र, या अपघातातून 155 लोक आश्चर्यकारकरित्या बचवले. जेव्हा हे दुर्घटनाग्रस्त विमान लोकांनी पाहिले तेव्हा विमान नदीवर होते आणि प्रवासी विमानावर चढलेले होते. हा अपघात नेमका कसा घडला जाणून घेऊया.
15 जानेवारी 2009 रोजी यूएस एअरवेजच्या विमानाने 1549 अमेरिकेच्या लागार्डिया विमानतळावरून टेक ऑफ केले. टेक ऑफनंतर काही वेळातच पक्ष्यांचा एक थवा विमानाला धडकला. यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन निकामी झाले. विमानात क्रूसह 155 प्रवासी होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून, वैमानिकाने ताबडतोब हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क साधला. मात्र, जवळच्या कोणत्याही विमानतळावर लँड करणे शक्य नसल्याचे त्याच्या लक्षात आले. इंजिन बिघाड झाल्यानंतर विमान उड्डाण सुरू ठेवू शकले नाही. त्याच वेळी, गर्दीच्या शहरात विमान उतरवणे देखील अशक्य होते. अशा परिस्थितीत, विमानाचे कॅप्टन चेस्ली सलीन बर्गर यांनी धाडस दाखवले आणि हडसन नदीवर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.
समोर मृत्यू दिसत असताना कॅप्टन सलीन बर्जर यांनी न्यू यॉर्कमध्ये वाहणाऱ्या हडसन नदीवर विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत धोकादायक होता. कॅप्टनने धाडसी निर्णय घेत नदीवर विमानाचे आपत्कालीन लँडिंग यशस्वी केले. कॅप्टन सलीन बर्जरच्या या शौर्यामुळे विमानातील सर्व 155 लोकांचे प्राण वाचले. यासाठी त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कारही मिळाले. त्यांना अमेरिकेचा सर्वोच्च पदक ‘द प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ देखील मिळाला.
कॅप्टन सुली बर्जर यांनी दाखवलेल्या धाडसामुळे रातोरात ते अमेरिकन लोकांसाठी हिरो बनली. या घटनेला ‘मिरॅकल ऑन द हडसन’ असे नाव देण्यात आले. हॉलिवूड दिग्दर्शक क्लिंट ईस्टवुड यांनी 2016 मध्ये या घटनेवर एक चित्रपटही बनवला होता. त्याचे नाव ‘सुली: मिरॅकल ऑन द हडसन’ असे होते. या चित्रपटात टॉम हँक्सने सुलीची भूमिका साकारली होती.
SOURCE : ZEE NEWS