Home LATEST NEWS ताजी बातमी व्हेनेझुएलात काही सेकंदाच्या अंतराने भूकंपाचे दोन तीव्र झटके, हजारो जणांच्या मृत्यूची शक्यता

व्हेनेझुएलात काही सेकंदाच्या अंतराने भूकंपाचे दोन तीव्र झटके, हजारो जणांच्या मृत्यूची शक्यता

5
0

Source :- BBC INDIA NEWS

व्हेनेझुएलात भूकंपाचे दोन झटके

फोटो स्रोत, Getty Images/BBC News

Published

वाचन वेळ: 2 मिनिटे

व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे काही सेकंदाच्या अंतराने एकापाठोपाठ भूकंपाचे दोन तीव्र झटके आले. पहिला झटका 7.2 रिश्टर स्केलचा होता तर दुसरा 7.5 तीव्रतेचा होता.

या भूकंपामुळे इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि लोक आपल्या घरातून निघून रस्त्यावर आले आहेत. आपली घरे रिकामे करावीत असे आवाहन गृहमंत्र्यांनी नागरिकांनी केले आहे.

या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार अंदाजे 10,000 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

नॅशनल हॉलिडे असल्यामुळे भूकंपावेळी अनेक लोक आपल्या घरी उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता भूकंप आला.

भूकंपाचे केंद्र कराकासच्या पश्चिमेला मोंटालबान क्षेत्रात होते. हा झटका इतका तीव्र होता की कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत याचे हादरे जाणवले.

व्हेनेझुएलाच्या इतर राज्यातही भूकंपाचे झटके जाणवले. व्हेनेझुएलाच्या गृहमंत्र्यांनी टीव्हीवर सांगितले की देशातील इतर राज्य देखील प्रभावित झाली आहेत.

व्हीटीव्ही शी फोनवरुन बोलताना त्यांनी म्हटले की सर्व संकेत हेच सांगत आहेत की या भूकंपांची तीव्रता सातहून अधिक होती.

गृहमंत्री म्हणाले, या झटक्यांची तीव्रता त्रूजिलो, याराकुई, काराबोबो, अरागुआ, मिरांडा, कराकास आणि ला गुआइरा या ठिकाणी जाणवली.

पुढे त्यांनी सांगितले की कराकासमध्ये पालोस ग्रांदेस आणि अल्तामीरा हे भाग भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC