Home LATEST NEWS ताजी बातमी व्हेनेझुएला भूकंपातील मृतांचा आकडा आता 1430 वर, तर हजारो जखमी, जाणून घ्या...

व्हेनेझुएला भूकंपातील मृतांचा आकडा आता 1430 वर, तर हजारो जखमी, जाणून घ्या सद्यस्थिती

4
0

Source :- BBC INDIA NEWS

व्हेनेझुएलात भूकंपाचे दोन झटके

फोटो स्रोत, Getty Images/BBC News

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे 24 जूनला काही सेकंदाच्या अंतराने एकापाठोपाठ भूकंपाचे 2 तीव्र झटके आले. पहिला झटका 7.2 होता तर दुसरा 7.5 तीव्रतेचा होता.

सरकारी आकडेवारीनुसार, व्हेनेझुएलातील 2 शक्तीशाली भूकंपात आतापर्यंत 1430 जणांचा मृत्यू झाला असून हजारो जखमी झाले आहेत.

या भूकंपात शेकडो इमारती कोसळल्या असून अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा तासागणिक वाढता आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार सुमारे 50 हजार लोक बेपत्ता आहेत.

दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. आपल्या नातेवाईकांचा काही पत्ता लागतो का, या आशेने अनेक कुटुंबीय चिंताग्रस्त अवस्थेत प्रतीक्षा करत आहेत.

भूकंपामुळे देशाच्या उत्तरेकडील भागातील, तसेच राजधानी कराकासमधील अनेक इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे जखमींवर तात्पुरत्या वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत.

काराकास आणि जवळच्या ला ग्वायरा या किनारपट्टीच्या शहरात कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालून लोकांचे मदतीसाठी ओरडण्याचे आवाजही ऐकू येत होते.

सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, विविध देशांतील शेकडो बचाव कर्मचारी व्हेनेझुएलात दाखल झाले असून आणखी मदतपथकं येत आहेत.

तीव्र भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून अजूनही शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.

फोटो स्रोत, Reuters

देशातील बचाव पथकं अपुरी पडत असली तरी मेक्सिको, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय बचाव पथकं मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. मात्र, एवढी मदतही अपुरी ठरत आहे.

दरम्यान, गेल्या 100 वर्षांतील व्हेनेझुएलामधील हा सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक मानला जात आहे.

मानवतावादी मदत संस्थांच्या मते, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना जिवंत बाहेर काढण्यासाठी पहिले 48 ते 72 तास अत्यंत निर्णायक असतात. मात्र, अडकलेल्या व्यक्तींना अन्न आणि पाणी मिळत असेल तर हा कालावधी आणखी वाढू शकतो.

या भूकंपामुळे मृतांचा आकडा खूपच जास्त असू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देशाच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होर्हे रोड्रिग्ज म्हणाले, “प्रत्येक वाचवलेला जीव हा चमत्कार आहे. या आपत्तीची भीषणता आम्ही कुणापासूनही लपवणार नाही.”

‘युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे’च्या (USGS) मते, मृतांची संख्या 10 हजारच्या वर जाण्याची शक्यता 44 टक्के आहे.

देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शवली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितलं आहे की, अमेरिका व्हेनेझुएलामध्ये “तात्काळ शोध आणि बचाव पथके, वैद्यकीय संसाधने आणि मानवतावादी मदत” पाठवत आहे.

भूकंपात उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून वाचलेल्यांचा शोध घेताना बचाव पथक

फोटो स्रोत, Juan BARRETO / AFP via Getty Images

या भूकंपामुळे इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि लोक आपल्या घरातून निघून रस्त्यावर आले आहेत. आपली घरे रिकामे करावीत, असे आवाहन गृहमंत्र्यांनी नागरिकांनी केले आहे.

नॅशनल हॉलिडे असल्यामुळे भूकंपावेळी अनेक लोक आपल्या घरी उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता भूकंप आला.

भूकंपाचे केंद्र कराकासच्या पश्चिमेला मोंटालबान क्षेत्रात होते. हा झटका इतका तीव्र होता की कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत याचे हादरे जाणवले.

या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Manaure QUINTERO / AFP via Getty Images

व्हेनेझुएलाच्या इतर राज्यातही भूकंपाचे झटके जाणवले. व्हेनेझुएलाच्या गृहमंत्र्यांनी टीव्हीवर सांगितले की देशातील इतर राज्य देखील प्रभावित झाली आहेत.

व्हीटीव्ही शी फोनवरुन बोलताना त्यांनी म्हटले की सर्व संकेत हेच सांगत आहेत की या भूकंपांची तीव्रता सातहून अधिक होती.

गृहमंत्री म्हणाले, या झटक्यांची तीव्रता त्रूजिलो, याराकुई, काराबोबो, अरागुआ, मिरांडा, कराकास आणि ला गुआइरा या ठिकाणी जाणवली.

पुढे त्यांनी सांगितले की कराकासमध्ये पालोस ग्रांदेस आणि अल्तामीरा हे भाग भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये जाहीर केलं की, त्यांनी व्हेनेझुएलाच्या जनतेला मदत करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश अमेरिकन संस्थांना दिले आहेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिलं, “व्हेनेझुएलाच्या जनतेला बसलेले दोन मोठे भूकंप अत्यंत तीव्र होते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. अमेरिका मदत करण्यास सज्ज आणि इच्छुक आहे.”

त्यांनी पुढे लिहिलं, “मी माझ्या सरकारच्या सर्व यंत्रणांना त्वरित कारवाई करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. आमच्या या नवीन आणि चांगल्या मित्रांच्या मदतीसाठी आम्ही तत्पर असू.”

ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

फोटो स्रोत, Reuters

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ (X) वर लिहिलं, “व्हेनेझुएलामध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे निर्माण झालेल्या विनाशामुळे मला अत्यंत दुःख झालं आहे. भारतीयांच्या वतीने, मी व्हेनेझुएलाचे सरकार आणि तिथल्या जनतेप्रती, तसेच ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्या कुटुंबांप्रती माझ्या अत्यंत संवेदना व्यक्त करतो.”

“आम्ही जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आणि या कठीण काळात बाधित झालेल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भारत सर्वतोपरी मदत करण्यास सज्ज आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.

व्हेनेझुएलामध्ये भूकंप का झाला?

व्हेनेझुएला हा भूकंप होण्याचा अत्यंत उच्च धोका असलेल्या प्रदेशात वसलेला देश आहे. इथे कॅरिबियन प्लेट आणि दक्षिण अमेरिकन प्लेट या दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना मिळतात.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, बुधवारी झालेल्या दोन भूकंपांपैकी दुसरा आणि अधिक तीव्र धक्का या प्लेट्सच्या (भूगर्भीय पट्ट्यांच्या) सीमेजवळील हालचालींमुळे बसला होता.

याचा अर्थ असा की, टेक्टोनिक प्लेट्समधील दोष-रेषा (fault lines) किंवा भेगा क्षितिजसमांतर दिशेने सरकतात. जेव्हा ही हालचाल अचानक आणि वेगाने होते, तेव्हा भूकंप होतो.

व्हेनेझुएला भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

यूएसजीएस (USGS) ने म्हटलं आहे की, “जरी नकाशांवर भूकंप अनेकदा केवळ एका बिंदूद्वारे दर्शवले जात असले, तरी या तीव्रतेच्या भूकंपाकडे एका मोठ्या ‘फॉल्ट’ (भ्रंश) क्षेत्रावर होणारी हालचाल किंवा स्लीप म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल.”

एजन्सीच्या मते, आज झालेले दोन भूकंप बहुधा “जमिनीतील भेगांच्या (rupture) परस्परक्रियेची एक गुंतागुंतीची प्रक्रिया” दर्शवतात.

USGS ने असा इशाराही दिला आहे की आणखी धक्के बसण्याची शक्यता कायम आहे आणि त्यापैकी काही धक्के बऱ्यापैकी तीव्र असू शकतात.

कोलंबियापर्यंत जाणवले धक्के

बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी विल ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये अनेक इमारतींना तडे गेल्याचे दिसून येत आहे. काही इमारतींचे मोठे नुकसान झाले असून काही इमारती कोसळल्याही आहेत.

भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीने हजारो रहिवासी अद्याप त्यांच्या घरांमध्ये परतलेले नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

आफ्टरशॉकच्या (पुन्हा बसणाऱ्या धक्क्यांच्या) भीतीमुळे हजारो लोक अजूनही आपल्या घरांमध्ये परतलेले नाहीत.

भूकंपाचे धक्के कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत जाणवले.

सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नेमकं किती नुकसान झालं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC