Source :- ZEE NEWS
इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या तणाव सुरु आहे. इस्त्रायलने इराणवर हल्ला करत त्यांच्या लष्करी आणि अणुप्रकल्प ठिकाणांना लक्ष्य केलं. यामुळे दोन्ही देशात तणाव वाढला असून, याच पार्श्वभूमीवर इस्त्रायलने सोमवारी सरकारी माध्यमाच्या मुख्यालय आयआरआयबीवर हल्ला केला. यावेळी लाईव्ह अँकरिंग करणाऱ्या अँकरने धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं असून, व्हिडीओ व्हाययरल झाला आहे.
इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर काळ्या धुराच्या लोटांनी वेढलेले आयआरआयबीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. इस्रायलने आयआरआयबी मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतर व्हिडीओत मुख्यालयाला हादरा बसला असून, सगळं काही कोसळताना दिसत आहे.
यापूर्वी, इस्रायलने पश्चिम तेहरानमधील एका लष्करी तळावर हल्ला केला होता. इराणी राजधानीच्या अनेक भागात स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. इस्रायली लष्कराने इराणी राजधानीतील लष्करी लक्ष्यांवर हल्ला करताना तेहरानमधील नागरिकांना बाहेर पडण्यास सांगितलं होतं.
BREAKING
Live footage of Islamic Regime state TV broadcaster, IRIB, being hit by Israel.
This is a huge blow to the terrorist Islamic Republic’s propaganda network in Iran.
इस्रायली संरक्षण दलांनी (आयडीएफ) इराणी नागरिकांना आश्रय घेण्यासाठी धावण्यापूर्वी स्थलांतराचे इशारे मिळत नाहीत असं म्हटलं आहं, त्यांनी तेहरानमधील नागरिकांसाठी फारसी भाषेत इशारा प्रकाशित केला आहे अशी माहितीही दिली आहे.
सोमवारी पहाटे, इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायली प्रमुख शहरांवर हल्ला केला, ज्यामध्ये 7 ऑक्टोबर 2023 पासून गाझामध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू असताना या प्रदेशात पूर्ण युद्धाची भीती वाढली होती.
SOURCE : ZEE NEWS