Source :- ZEE NEWS
Sunita Williams Christmas Celebration : गेल्या 10 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या आणि परतीच्या प्रवासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचे काही नवे फोटो नुकतेच समोर आले. हे फोटो होते यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर मुक्काम वाढला असल्याचं लक्षात येताच साधारण दोन दिवसांच्या फरकानं या टीमचे काही फोटो समोर आले. इथं ही मंडळी नाताळसण साजरा करताना दिसली. अंतराळातील हे सेलिब्रेशन पाहून नेटकरी मात्र पेचातच पडले. इतकी गंभीर परिस्थिती असताना या मंडळींनी आनंद लुटणं अनेकांनाच खटकलंय.
पृथ्वीपासून कैक हजार किमी दूर असतानाही तिथं अंतराळात या मंडळींचा उत्साह काही प्रश्नांना वाव देऊन गेला असंच नेटकऱ्यांचं म्हणणं. जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळापासून तिथं अवकाशात असणाऱ्या या अंतराळवीरांकडे ख्रिसमसचे कपडे, त्यासाठीच्या या टोप्या आणि सजावटीचं साहित्य आलं कुठून? हा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
‘यांनी सँटाच्या टोप्या मोहिमेआधीच नेल्या होत्या का?’ असंही एका युजरनं विचारलं. काही नेटकऱ्यांनी तर हे फोटो आणि तिथं ख्रिसमसचं सेलिब्रेशन, तिथं असणारं हे सर्व सामान यामागं एक मोठी फसवणूक असल्याचा तर्कही लावला.
या सर्व चर्चांमध्ये नासाच्या स्पष्टीकरणानंही लक्ष वेधलं. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार नासानं नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवसांमध्ये स्पेसएक्स डिलिव्हरीच्या माध्यमातून नाताळच्या या टोप्या, ख्रिसमस मिल, सजावटीचं सामान अवकाशात पाठवलं होतं. किंबहुना इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर वर्षातून काही वेळा सामानाची साठवणूक केली जाते असंही या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं.
To everyone on Earth, Merry Christmas from our @NASA_Astronauts aboard the International @Space_Station. pic.twitter.com/GoOZjXJYLP
— NASA (@NASA) December 23, 2024
नासानं नाताळसणासाठी पाठवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये हॅम, टर्की, बटाटे, भाज्या, पाई, कुकीजचा समावेश आहे. नासाच्या मोहिमेअंतर्गत काही तांत्रित सामग्रीसह चक्क अंतराळवीरांसाठी टोप्या आणि ख्रिसमस ट्रीसुद्धा पाठवण्यात आली होती.
राहिला प्रश्न सुनीचा विलियम्स यांचा, तर अवकाशात ख्रिसमस साजरा करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. 2006 मध्येही एका मोहिमेदरम्यान त्यांचा नाताळसण तिथं साजरा झाला होता. पण, यावेळी मात्र त्यांचा हा लांबलेला मुक्काम पूर्णपणे अनपेक्षित होता हेच खरं.
SOURCE : ZEE NEWS