Source :- ZEE NEWS
How To Apply for Gold Card Visa : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान झाल्या क्षणापासूनच (Donald Trump) डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अनेक धोरणांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. त्यांच्या काही निर्णयांनी अनेक देशांना अडचणीतही आणलं. पण, ट्रम्प मात्र त्यांच्या भूमिकांवर ठाम असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. याच ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये नवा ‘गोल्ड कार्ड व्हीसा’ (Gold Card Visa) हे धोरण सादर केलं. याची अनेकांनाच दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती.
आता हे धोरण जाहीर करण्यात आल्यानंतर या व्हिसासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे. ज्याच्या मदतीनं श्रीमंत परदेशी नागरिक आणि कंपन्यांना अमेरिकेचं ‘ग्रीन कार्ड’ आणि त्यामागोमाग नागरिकत्वं सहजपणे मिळणार आहे. हे धोरण काहीसं ‘ग्रीन कार्ड’सारखं असलं तरीही त्याचा फायदा मात्र अधिक असणार आहे असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. या धोरणामुळं कंपन्यांना बिगर अमेरिकी, निष्णांत व्यक्तींना अमेरिकेतच नागरिकत्वं आणि वास्तव्य देता येणार आहे.
व्हाईट हाऊसच्या रुझवेल्ट रुममध्ये काही Business Leaders च्या उपस्थितीमध्ये ट्रम्प यांनी या धोरणाची घोषणा करत Truth च्या माध्यमाकून त्यावर आपलं मत मांडलं. ‘अमेरिकी सरकारचं ट्रम्प गोल्ड कार्ड आता आलं आहे. सर्व योग्य आणि पात्र नागरिकांसाठी हा नागरिकत्वाचा सोपा मार्ग आहे. ही एक कमाल बाब आहे. दिग्गद अमेरिकी कंपन्या आता त्यांच्या इथं सेवेत असणाऱ्या प्रचंड कौशल्यवान कर्मचाऱ्यांना त्यांच्यापाशीच ठेवू शकणापर आहेत’, असं त्यांनी लिहिलं. ही पूर्ण योजना ग्रीन कार्डसारखी असली तरीही त्याचे फायदे अनेक आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रम्प गोल्ड आणि प्लॅटिनम कार्ड म्हणजे काय?
अमेरिकेत हा व्हीसा उपक्रम देशाच्याच फायद्यासाठी सुरू करण्यात आला आहे. अमेरिकेला फायदा देणाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्याची आखणी करण्यात आली आहे. या व्हिसामुळं EB-1, EB-2 अशा श्रेणीत ग्रीन कार्ड मिळतं. सुरुवातीया यामध्ये 15000 डॉलर इतकी प्रोसेसिंग फी देऊन अर्ज करणं अपेक्षित असतं. यानंतर त्या बॅकग्राऊंड चेक आणि 1 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 9 कोटी रुपयांची बक्षीसपात्र रक्कम द्यावी, जी वैयक्तिक अर्जदारासाठी आहे. अमेरिकेसाठी ही रक्कम ‘सब्सटँशिअल बेनिफिट’चा पुरावा असेल. याशिवाय स्टेट डिपार्टमेंटचीसुद्धा फी भरावी लागणार आहे. कंपन्यांना ग्रीन कार्ड व्हीसासाठी दुप्पट रक्कम म्हणजेच प्रति कर्मचारी 2 मिलियन डॉलर अर्थात 18 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
प्लॅटिनम कार्ड ही संकल्पना आता अमेरिकेच्या दृष्टीक्षेपात असून, यासाठी प्रतीक्षायादीसुद्धा सुरू झाली आहे. जिथं 5 मिलियन डॉलर म्हणजे साधारण 45 कोटी रुपये देत अमेरिकेत 270 दिवस व्यतीत करता येऊ शकतात, या व्हिसासह राहणाऱ्यांना कोणताही कर लागू नसेल. कंपन्यांसाठी अमेरिकी सरकारनं कॉर्पोरेट गोल्ड कार्डची सोय केली असून, यासाठी 15000 डॉलर इतकी प्रोसेसिंग फी आकारली जाणार आहे.
कोण करु शकतं अर्ज?
अर्जदाराकडे अमेरिकेत स्वत:चं घर असणं अपेक्षित आहे. त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी. वैध व्हीसा असावा. या प्रक्रियेत कुटुंबालाही समाविष्ट करता येतं. ज्यामध्ये पती, पत्नी आणि 21 वर्षांहून कमी अविवाहित मुलांचा समावेश आहे. जिथं प्रत्येक व्यक्तीसाठी 15000 अमेरिकी डॉलर इतकी फी वेगळ्यानं देत 1 मिलियन डॉलरची बक्षिसपात्र रक्कम देणं अपेक्षित असेल.
अर्ज करण्यासाठी www.trumpcard.gov या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात येत असून, प्रोसेसिंग फी जमा केल्यानंतर वेटिंग आणि अप्रूवल या प्रक्रियांसाठी महिन्यांचा कालावधी लागू शकतो. यानं प्रकट मुलाखत आणि कागदपत्र पाठवणं अपेक्षित असेल. प्लॅटिनम कार्डसाठी गोल्डन कार्ड व्हिसाचा अर्ज करणारे प्रतीक्षा यादीत नाव नोंदवू शकतात. अमेरिका या व्हिसा प्रक्रियेतून अब्जावधी डॉलर कमवण्याचा मानस आहे.
SOURCE : ZEE NEWS


