Source :- ZEE NEWS

Giorgia Meloni Video: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना त्यांचे चाहते अतिशय उत्कृष्ठ नेता मानतात. मेलोनी यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. जॉर्जिया मेलोनी जेथे कुठे जातात तेथे त्या कायमच चर्चेत असतात. अशातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण एका देशाच्या पंतप्रधानांनी 48 व्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट केली आहे.

अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी त्यांच्यासाठी असे काही केले की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अबू धाबी येथे झालेल्या वर्ल्ड फ्यूचर एनर्जी समिट दरम्यान घडली जेव्हा तो मेलोनीसमोर चक्क गुडघे टेकले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 

मेलोनीला पाहताच ते…. 

संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे झालेल्या वर्ल्ड फ्यूचर एनर्जी समिटमज्ये जगभरातील नेते एकत्र आले होते. दरम्यान, मेलोनी यांच्या वाढदिवसानिमित्त एडी रामा यांनी त्याला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. रामा यांनी मेलोनीला एक सुंदर स्कार्फ भेट दिला जो एका इटालियन डिझायनरने डिझाइन केला होता. यानंतर, रामा यांनी गुडघ्यावर बसून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण टाळ्या वाजवू लागले.

एडी रामा यांनी काय म्हटलं? कसा होता अंदाज 

भेटवस्तू देताना रामा यांनी सांगितले की, हा स्कार्फ दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंधांचे प्रतिबिंबित करतो. त्यांनी मेलोनीला दिलेली ही खास भेट स्वतःच्या हातांनी घातली. यादरम्यान, त्यांनी गमतीने म्हटले की, मी माझ्या उंचीचा वापर करून तुमच्यासमोर नतमस्तक झालो आहे. मेलोनी यांनीही ही अनोखी शैली हसतमुखाने स्वीकारली.

राजकारणातील उत्तम उदाहरण

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, या दोन्ही नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मजबूत भागीदारी दाखवली आहे. मेलोनी आणि रामा यांच्या नेतृत्वाखाली, इटली आणि अल्बेनियाने ऊर्जा आणि स्थलांतर यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकत्र काम केले आहे. अबू धाबी परिषदेत दोन्ही देशांनी संयुक्त अरब अमिरातीसह 1अब्ज युरोच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली, जो एड्रियाटिक समुद्र ओलांडून अक्षय ऊर्जेसाठी समुद्राखालील आंतरकनेक्शन स्थापित करेल.

SOURCE : ZEE NEWS