Source :- ZEE NEWS

Dire Prophecy: पृथ्वीचा विनाश अटळ आहे. एक दिवस जगाचा अंत होणार हे नक्की आहे. मात्र, जगाचा विनाश कधी आणि कसा होणार याबाबत अनेक दावे करण्यात येतात. अनेक तर्क मांडले जातात. कुणीही याबाबत काहीच ठामपणे सांगू शकलेले नाही. पृथ्वीच्या विनाशाबाबत आजपर्यंतची सर्वात धक्कादायक भविष्यवाणी करण्यात आली आहे. एका क्षणात  पृथ्वी नष्ट होईल आणि  मानवांसह सर्व  उध्वस्त होणार अशी ही भविष्यवाणी आहे. जाणून घेऊया ही भविष्यवाणी नेमकी काय आहे आणि ही भविष्यवाणी कुणी केली आहे. 

केसी नावाच्या एका महिलेने हा दावा केला आहे. केसी  आणि तिचा पती 12 वर्षांपासून म्हणजेच 2013 पासून एका आत्म्याशी संवाद साधत आहे. केसीने अनेक खळबळजनक दावे केले आहेत.  महिलेने असा दावा केला की त्या आत्म्याला हिरोशिमा अणुबॉम्ब स्फोटाबद्दल आधीच माहिती होती. आत्म्याने त्यांना ही माहिती दिली. आत्मात्याने त्यांना अनेक इशारे दिले आहेत. या आत्म्याचे नाव सेव्हन असे आहे. 

सेव्हन नावाच्या आत्म्याने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बबद्दलही सेव्हनने सांगितले होते.  बाह्य शक्तींकडून मानवांना इशारा मिळण्याचे हे पहिलेच उदाहरण नाही.  बाबा वांगाच्या भविष्यवाण्या अलिकडेच व्हायरल झाल्या आहेत. विशेषतः मार्चमध्ये म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा आहे. 2025 मध्ये ‘विनाशकारी भूकंप’ येण्याची भविष्यवाणी बाबा वेंगाने केली होती. अशाचत आता  सेव्हनने केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे. 

लवकरच एक क्षणात पृथ्वी नष्ट होणार आहे. हा विनाश इतका भयानक असेल की  मानवांसह सर्व काही उद्धवस्त होणार अशी भविष्यवाणी सेव्हन आत्म्याने केली आहे. 

SOURCE : ZEE NEWS