Source :- ZEE NEWS

India Pakistan War Water Strike: पहलगाम (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर शक्य त्या सर्व मार्गांनी पाकिस्तानला जाळ्यात अडकवत अद्दल घडवण्यासाठी भारताकडून अनेक निर्णय घेण्यात आले. पाकच्या दिशेनं जाणाऱ्या नद्यांचे प्रवाह अडवून या देशाची कोंडी करु पाहणाऱ्या भारतानं एकिकडे ऑपरेशन सिंदूरनं हादरा दिलेला असतानाच आता Water Strike करत पाकिस्तानची आणखी गळचेपी करण्यासाठी भारतानं मोठं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे. 

भारतानं चिनाब नदीवर असणाऱ्या रियासी येथील सलाल धरणारे तीन दरवाजे शुक्रवार 9 मे 2025 रोजी उघडले. सिंधू जल करार रद्द केल्यानंतर भारतानं या धरणाची दारं बंद करत पाकिस्तानच्या दिशेनं जाणारं पाणी रोखून धरलं होतं. आता मात्र याच धरणाची दारं उघडत पाकिस्तानला भारतानं पूराच्या संकटात लोटल्याचं स्पष्ट होत आहे. 

फक्त सलाल धरणच नव्हे, तर रामबन येथील बगलिहार धरणाची दारंसुद्धा भारतानं उघडली होती. मुळात जलसंधी रद्द झाल्यामुळं आता शत्रू राष्ट्राला किती पाणी द्यायचं याचे सर्व निर्णय भारत घेत असून, सध्याच्यचा घडीला पाकवर वॉटर स्ट्राईक करत या देशाला जलसंकटात लोटण्याची भारताची रणनिती असल्याचं स्पष्ट होत आहे. भारताकडून हे पाणी सोडलं जात असल्यामुळं आता पाकिस्तानच्या अनेक सखल भागांमध्ये पूराचा धोका वाढला आहे. 

आधी शस्त्रानं मारा आणि आता पाण्यानं… 

भारतानं धरणाची दारं उघडण्यापूर्वी म्हणजेच 8 मे 2025 रोजी पाकिस्तानच्या कटकारस्थानांना जशास तसं उत्तर देत या देशावर हवाई हल्ले चढवले. पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं लक्षात येताच हे ड्रोन हवेतच नष्ट करत भारतानं पाकिस्तानला चांगलाच इंगा दाखवला. ज्यानंतर देशाच्या सीमा भागांमध्ये तणाल वाढला असून, दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भारताकडून पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडत, जमीन, पाणी आणि हवेतूनही या देशावर मारा करण्याची भूमिका सध्या भारतानं स्वीकारल्याचं स्पष्ट होत आहे. 

SOURCE : ZEE NEWS