Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

1 तासापूर्वी

वर्षातला एक ठराविक काळ असतो, जेव्हा प्रत्येक नोकरदाराला त्याची कंपनी सांगते की, टॅक्स प्रूफ सबमिट करा किंवा या आर्थिक वर्षात टॅक्स वाचवण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करणार आहात ते सांगा. म्हणजे टॅक्स डिक्लरेशन्स.

आर्थिक वर्ष असतं ते एका वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून ते पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत आणि आर्थिक वर्ष संपलं की, त्यासाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न आपण फाईल करतो.

एप्रिल ते मार्च अशा आर्थिक वर्षामधल्या आपल्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. पण टॅक्स वाचवण्यासाठीचे काही राजरोस मार्ग आहेत.

काय आहेत हे टॅक्स सेव्हिंग ऑप्शन्स?

आर्थिक वर्षाची आखणी

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये – म्हणजे जानेवारी – फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्रूफ सबमिट करायची असतात. कारण तुमची कंपनी यावरून तुमच्याकडून किती टॅक्स कापायचा याचं गणित करते.

तुम्ही गुंतवणुकीची कागदपत्रं दाखल केलीत, की त्यानुसार तुमच्या पगारातून टॅक्स कापून सरकारकडे भरला जातो.

यावरून तयार होतो तुमचा फॉर्म 16. जो तुम्हाला तुमची कंपनी साधारण जून महिन्यात देते आणि मग 31 जुलैपर्यंत आधीच्या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा असतो.

समजा तुमचा टॅक्स जास्त कापला असेल, तुम्ही रिर्टन फाईल करताना आधी न दाखवलेली गुंतवणूक दाखवलीत, तर तुम्हाला टॅक्स रिफंड मिळतो.

या सगळ्या गोष्टी ठराविक वेळी करायच्या असल्या, तरी टॅक्स प्लॅनिंग म्हणजे जास्त आयकर भरावा लागू नये, म्हणून कुठे गुंतवणूक करायची, याचा विचार तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच करायला हवा. तसेच त्यानुसार मग तुम्ही पुढच्या 12 महिन्यांत गुंतवणूक करू शकता.

तुम्ही जुनी कर प्रणाली निवडली आहे की नवी यावर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीसाठी टॅक्स बेनिफिट मिळू शकतो का, ते ठरतं. जुन्या रचनेनुसार रिटर्न फाईल करणार असाल, तर तुम्हाला हे टॅक्स डिडक्शन बेनिफिट्स मिळतात.

आता पाहूयात कोणकोणत्या गुंतवणुकीसाठी टॅक्स वाचवता येईल.

सेक्शन 80C

यामध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंत टॅक्स वाचवू शकता. यासाठी पीपीएफ,  आयुर्विम्याचा हप्ता म्हणजे लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी प्रीमियम, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, इक्विटी लिंक सेविंग स्कीममधली गुंतवणूक ग्राह्य धरली जाते. जर तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल, तर त्याच्या प्रिंसिपल अमाऊंट म्हणजे कर्जाच्या मूळ रक्कमेवरही याच सेक्शनखाली टॅक्स बेनिफिट मिळतो.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

सेक्शन 80CCD

जर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये पैसे टाकत असाल, तर तुम्हाला 80C च्या दीड लाखांच्यावर अधिकच्या 50,000 पर्यंत टॅक्स वाचवता येईल.

सेक्शन 80E

जर तुम्ही स्वतःसाठी, जोडीदारासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतलं असेल, तर सेक्शन 80 ई नुसार तुम्हाला व्याजावर कर सवलत मिळू शकते. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

म्हणजे समजा स्टँडर्ड डिडक्शन कापल्यानंतर तुमचं करपात्र उत्पन्न 7 लाख रुपये आहे आणि तुम्ही एज्युकेशन लोनचं व्याज म्हणून 1.5 लाख रुपये भरतायत तर ही रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा होईल आणि तुमचं टॅक्सेबल इन्कम 5.5 लाख धरलं जाईल.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

सेक्शन 80D

जर तुम्ही मेडिकल इन्शुरन्स – हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल, तर त्याच्या हप्त्यांवर तुम्हाला दरवर्षी 25,000 रुपयांपर्यंतचं टॅक्स डिडक्शन घेता येईल. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी दुप्पट म्हणजे 50 हजार रुपये आहे. स्वतःच्या, जोडीदाराच्या,मुलांच्या आणि आईवडिलांच्या हेल्थ इन्शुरन्सवर ही सवलत घेता येईल.

सेक्शन 24

सेक्शन 24 अंतर्गत गृहकर्ज म्हणजे होमलोनच्या प्रिन्सिपलवर जशी कर सवलत मिळते, तशीच इंटरेस्ट म्हणजे तुम्ही भरत असलेल्या व्याजावरही टॅक्स डिडक्शन मिळतं. यानुसार तुम्हाला 2 लाखांपर्यंतची करसवलत दरवर्षी मिळू शकते. अट ही तुम्हाला घराचं पझेशन मिळालंय आणि तुम्ही इथे राहताय.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 3

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

सेक्शन 80TTA

सेव्हिंग्स अकाऊंटमध्ये असणाऱ्या तुमच्या पैशांवर तुम्हाला जे व्याज मिळतं त्यावर तुम्हाला 10,000 रुपयांची टॅक्स सवलत मिळते.

हेच डिडक्शन ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षाला 50,000 रुपये आहे.

सेक्शन 80DD

तुमच्या कुटुंबातल्या तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला अपंगत्व असेल आणि त्यांच्या उपचारांचा खर्च तुम्ही करत असाल, तर त्यावर तुम्हाला टॅक्स डिडक्शन मिळू शकतं. अपंगत्व किती प्रमाणात आहे, त्यानुसार हे डिडक्शन असतं.

सेक्शन 80DDB

स्वतःच्या, जोडीदाराच्या वा कुटुंबामध्ये तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारांवर केलेल्या खर्चावर तुम्हाला या सेक्शनखाली कर सवलत मिळते. ज्यांच्यावर उपचार करण्यात आलेत ती व्यक्ती 60 वर्षांपेक्षा लहान असेल, तर जास्तीत जास्त 40,000 आणि साठीच्या वर असेल तर 1 लाखापर्यंतची कर सवलत मिळते.

सेक्शन 80G

तुम्ही जर भारतातल्या काही ठराविक ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थाना पैशांची देणगी दिली असेल, तर त्यावर तुम्हाला कर सवलत मिळू शकते.

SOURCE : BBC