Source :- BBC INDIA NEWS
25 डिसेंबर 2024, 13:26 IST
अपडेटेड 43 मिनिटांपूर्वी
कझाकिस्तानमध्ये अकतऊ भागानजीक 67 प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान कोसळले असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे विमान अझरबैजान एरलाईन्सचे होते. हे विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या आपत्कालीन मदत सेवा पुरवणाऱ्यांना या विमानाला आग लागली असल्याचं आढळून आलं.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ही आग विझवण्यात आली आहे.
या दुर्घटनेतील काही प्रवाशांचा जीव वाचला असण्याची शक्यता आहे, असं कझाकिस्तानच्या इमर्जन्सी मिनिस्ट्रीने सांगितलं आहे.
मात्र, हे विमान कोसळण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC