Source :- ZEE NEWS

Indian Got Stabbed to Canda : कॅनडाच्या रॉकलॅन्ड भागात शनिवारी एका भारतीय नागरिकाची चाकू मारून हत्या करण्यात आलीय कॅनडामध्ये भारतीय दूतावासानं या विषयी माहिती दिली आहे. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा तपशील तिथल्या पोलिसांनी अजून उघड केलेला नाही. मात्र, भारतीय दूतावासानं ही माहिती दिली आहे की पीडित असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहेत. जशी मदत करता येईल तशी करणार आहे. 

दूतावासानाच्या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की ‘रॉकलॅन्डमध्ये भारतीय नागरिकाची चाकू मारून हत्या करण्याच्या घटनेनं आम्हाला देखील मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी सांगितलं की एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आम्ही स्थानिक लोकांच्या मदतीनं शोकग्रस्त कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहोत.’

स्थानीक मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्लेरेंस-रॉकलॅन्डमध्ये आज सकाळी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि दुसऱ्या व्यक्तीला लगेच अटक करण्यात आली आहे. पण, हे स्पष्ट झालं आहे की ही तिच घटना आहे ज्याचा उल्लेख हा भारतीय दूतावासाच्या सोशल मीडिया पोस्टवरून करण्यात आला आहे. 

हेही वाचा : ट्रॅम्प टॅरिफचा भारतावर परिणाम नाही, मग का रोज कोसळतंय शेअर मार्केट? 6 कारणे

सीबीसी न्यूज रिपोर्ट्सनुसार, ओंटारियोच्या पोलिसांनी रॉकलॅन्डच्या रहिवाशांना पोलिसांच्या उपस्थितीमुळे आणि झालेल्या घटनेमुळे खूप मोठा धक्का बसला आहे. चाकू मारून हत्या करण्याच्या घटनेनंतर सगळीकडे तणाव निर्माण झाला आहे. यामुळेच हल्लेखोराने तरुणाला लक्ष्य का केले याचा तपास केला जात आहे. यासोबतच, पूर्वीचे वैर आहे की आणखी काही आहे याचाही तपास केला जात आहे. पोलिस पथक प्रत्येक कोनातून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

SOURCE : ZEE NEWS