Source :- BBC INDIA NEWS

ब्रेकिंग

48 मिनिटांपूर्वी

कॅनडामधील व्हँकोव्हर शहरात गर्दीच्या ठिकाणी धावती कार घुसल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे कॅनडा पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

व्हँकुव्हरमध्ये एक स्ट्रिट फेस्टीव्हर सुरू असताना ही घटना घडली. मात्र, यात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याबाबत नेमकी माहिती समोर आली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, कार्यक्रम सुरू असताना रात्री 8 वाजेच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ड्रायव्हरने गर्दीत कार घुसवली.

याबाबत अधिक तपास सुरू असून त्यानंतर अधिक माहिती दिली जाईल, असंही पोलिसांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याठिकाणी वार्षिक लापु-लापु फेस्टिव्हल सुरू होता. फिलिपानो संस्कृतीचा उत्सव याद्वारे साजरा केला जातो. त्यावेळी रसत्याने चालणाऱ्यांना कारने उडवल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली.

सोशल मीडियावरील एका व्हीडिओमध्ये घटनेच्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि बचाव पथकाची गर्दी आणि खाली जखमी लोक पडलेले पाहायला मिळत आहे. मात्र त्या व्हीडिओची पुष्टी होऊ शकलेली नाही.

व्हँकुव्हरच्या महापौर केन सिम यांनी या घटनेचा प्रचंड धक्का बसल्याची प्रतिक्रिया एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केली. या घटनेतील पीडितांप्रती संवेदना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी काही जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिल्याचंही सिम यांनी सांगितलं आहे.

(ही बातमी अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC