Source :- ZEE NEWS

Cheapest European Country For Indian: भटकंतीची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक ठराविक बकेट लिस्ट असते. अर्थात या अविरत प्रवासामध्ये नेमकं आपल्याला कोणत्या ठिकाणांना भेट द्यायचीये हेच अनेकांनीच ठरवलेलं असतं. यामध्ये समाविष्ट असणारं एक ठिकाण म्हणजे युरोप. 

युरोपातील अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाऊन तेथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्याची अनेकांचीच इच्छा असते. मात्र ही हौस अनेकदा आर्थिक पाठबळाअभावी अपूरी राहते. पण, पद्धतशीर बेत आखून मात्र ही सहल परवडणाऱ्या दरातही पूर्ण करता येते. कारण असेही काही युरोपीय देश आहेत जिथं किमान खर्चाच फिरणं सहज शक्य होतं. 

कोणत्या देशांमध्ये स्वस्तात करता येईल युरोप सफर? 

क्रोएशिया 

समुद्रकिनाऱ्यावर वेळ व्यतीत करणाऱ्यांपैकी तुम्ही आहात तर, क्रोएशिया हा देश एक उत्तम पर्याय आहे. निळंशार पाणी, बेट आणि मन मोहणारं निसर्गसौंदर्य या देशाची जमेची बाजू. इथं आठवड्याभराचा खर्च आहे 80,000 रुपये ते 1.50 लाख रुपये. 

बर्लिन 

जर्मनीतील सर्वात जुनं शहर अशी ओळख असणाऱ्या बर्लिन इथं येऊन तुम्हाला एखाद्या ऐतिहासिक शहरात आल्याची अनुभूती होईल. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इथे येणं एक उत्तम पर्याय. सात दिवसांच्या प्रवासासाठी इथं 1 लाख रुपये ते 2 लाख रुपये इतका खर्च येतो. 

प्राग 

मे महिन्यात भटकंतीसाठी प्राग हेसुद्धा एक उत्तम ठिकाण आहे. रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटात दाखवलेला देश म्हणजे प्राग. इथं हवामान जास्त उष्णही नाही आणि जास्त गारठाही इथं पडत नाही. 

ग्रीस 

युरोप फिरण्याला प्राधान्यत देत असणाऱ्यांसाठी ग्रीस हा देश एक सुरेख पर्याय. ग्रीसची राऊंड ट्रीप 1 लाख रुपये ते 2 लाख रुपये इतका आहे. 

अल्बानिया 

युरोपातील एक लहान पण तितकाच सुरेख देश म्हणजे अल्बानिया. भारत ते अल्बानिया असा आठवडाभराचा प्रवास करण्यासाठी 38,000 रुपये ते 1.50 लाख रुपये इतका खर्च येतो. 

युरोपात प्रवास करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथं प्रवास करणाता एक प्रवासी किंवा एक पर्यटक म्हणून दिलं जाणारं प्राधान्य. त्यामुळं खर्च हा व्यक्तीनिहाय वेगळाही असू शकतो. 

SOURCE : ZEE NEWS