Source :- ZEE NEWS

Armenian genocide during World War I : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती शमण्याचं नाव घेत नसतानाच या परिस्थितीमध्ये आता एकाएकी तुर्कीएची चर्चा सुरू आहे. एकाएकी या देशाची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे, त्यांनी दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानला दिलेला पाठिंबा. या एका निर्णमुळं दोन्ही देशांमधील नात्यांमध्ये वितुष्ट आणून गेला. 

अनेकांच्या बकेटलिस्टमध्ये असणाऱ्या तुर्कीएला एकाएकी नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं जाऊ लागलं आणि इतिहासातील एक असा संदर्भ समोर आला, ज्यानं अनेकांनाच हादरा बसला. मुळात हे एक असं वास्तव जगासमोर आलं, ज्यावर कायमच तुर्कीएनं पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हे वास्तव आहे एका नरसंहाराचं. 

पहिल्या विश्वयुद्धाच्या वेळी… 

तुर्कीएच्या इतिहासात डोकावताना थेट पहिल्या विश्वयुद्धाच्या काळात गेल्यास, तेव्हाच्या तुर्कीएमधील ऑटोमन साम्राज्याची माहिती समोर येते. त्या काळात ऑटोमन साम्राज्य कोलमडण्याच्याच अवस्थेत होतं. मात्र, तरीही या साम्राज्याचा मुजोरपणा काही केल्या कमी होत नव्हता. हे तेच साम्राज्य होतं, ज्यांनी अतिशय योजनाबद्ध पद्धतीनं अल्पसंख्यांच अर्मेनियन नागरिकांचा नरसंहार सुरू केला आणि जवळपास 10 हजार अर्मेनियन नागरिकांना ठार केलं. 

तुर्कीएचा शासक अब्दुल हामिद द्वितीय यावम अर्मेनिया हे संपूर्ण मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा मनसुबा ठेवला होता. अर्मेनियातील नागरिकांचा नरसंहार दोन टप्प्यांमध्ये करण्यात आला होता. 1894 ते 1896 दरम्यान 80000 ते 100000 हून अधिक नागरिक मारले गेले आणि हजारो नागरिकांचं बळजबरीनं धर्मपरिवर्तन करण्यात आलं. 

ऑटोनम शासकाच्या एका आदेशानं होत्याचं नव्हतं झालं आणि रक्तरंजित इतिहास रचला गेला. महिलांवर अत्याचार झाले, त्यांना गुलामीच्या नरकात लोटलं गेलं. लहान मुलं आणि वयोवृद्धांना सीरियाच्या वाळवंटात मृत्यूच्या दाढेत लोटण्यात आलं. फक्त अर्मेनियन नव्हे तर, मूळचे सीरियातीन नसणारे नागरिक आणि युनानीसुद्धा इथं निशाण्यावर होते. 

नरसंहार सुरूच राहिला…. 

1915 मध्ये तेव्हाच्या ऑटोमन शासकानं अर्मेनियातील 250 प्रसिद्ध आणि विद्वानांना बंदी बनवून कांन्स्टेनटीनोपलमध्ये नेलं. तुर्कीए हा एक मुस्लिम बहुल देश असून अर्मेनियन नागरिक हे ख्रिस्त अल्पसंख्यांक होते. हा तोच वर्ग होता ज्यानं पहिल्या विश्वयुद्धाच्या अखेरपर्यंत तुर्कीएकडून होणारा अत्याचार सहन केला होता. 

पहिल्या विश्वयुद्धादरम्यान अर्मेनियन नागरिकांना देशद्रोही म्हटलं गेलं, त्यांच्याकडून स्वतंत्र देशाची मागणी केली जाऊ शकते या एका भीतीपोटी त्यांचं अन्नपाणी बंद करून रखरखीत वाळवंटात त्यांना मरणयातना सोसण्यासाठी सोडण्यात आलं. क्रूरतेचा कळस तेव्हा गाठला जेव्हा तुर्कीएच्या सैन्यात ‘बुचर बटालियन’ नावाची तुकडी करण्यात आली. ख्रिस्तधर्मीयांना निवडून त्यांचा खात्मा करण्याचं काम या तुकडीवर सोपवण्यात आलं होतं. त्यांची पद्धत इतकी क्रूर होती, की आजही त्याची वर्णनं वाचताना थरकाप उडतो. उपलब्ध संदर्भांनुसार बुचर बटालियनचे सैनिक अर्मेनियन नागरिकांना उंच पर्वचतांवरून फेकून देत, जिवंत दहन करत. 

ही तिच घटना होती, जेव्हापासून genocide  अर्थात नरसंहार हा शब्द जगासमोर आला. आधुनिक काळातील पहिला नरसंहार म्हणून अर्मेनियन नरसंहाराकडे पाहिलं जातं. तुर्कीएच्या इतिहासातील हे ते पान आहे जे सहसा जगासमोर आणलं जात नाही. तुर्कीएकडून कथित स्वरुपात कायमच या घटनेचा उल्लेख नरसंहार म्हणून करण्याचा विरोध केला जातो. 

SOURCE : ZEE NEWS