Source :- ZEE NEWS
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कार चक्क 32 फुटावरुन हवेत उडाली. हा व्हिडीओ इतका भयानक आहे की, तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. गुगल मॅप्समुळे काही लोकांचे जीव धोक्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये, एक कार पुलावरून हवेत उडते आणि थेट रस्त्यावर आदळते. हा अपघात इतका धोकादायक होता की पाहणारे घाबरले. गुगल मॅप्समुळे अपघाताचे बळी ठरणाऱ्या लोकांच्या या व्हायरल व्हिडिओने खळबळ उडाली आहे. ही घटना इतकी भयानक आहे की, ती पाहिल्यानंतर तुम्हाला रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅप वापरण्यासही भीती वाटेल.
गुगल मॅपमुळे कार उडाली…
हा व्हायरल व्हिडिओ mustsharenews नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओवर लिहिलेल्या कॅप्शनवरून ही घटना 5 एप्रिलची असल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ आता झपाट्याने व्हायरल होत आहे.
यामध्ये एक कार जवळपास 5 ते 12 मीटर अंतरावरुन खाली कोसळताना दिसत आहे. नशिबाने जेव्हा ती कार खाली कोसळळते तेव्हा खाली कोणतीच कार नव्हती. त्यामुळे अपघाताची तीव्रता कमी जाणवली.
व्हिडिओ पहा
Another Google Maps Fiasco- Couple in Indonesia drives off unfinished highway by
following Google Maps pic.twitter.com/Cy1Rro33L4— Rosy (@rose_k01) April 18, 2025
इंडोनेशियामध्ये, गुगल मॅप्समुळे, एका जोडप्याची कार बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावर गेली. पण पुलाचं काम अर्धवट झाल्यामुळे ही कार काही मीटर उंचीवरून थेट जमिनीवर पडले. 62 वर्षीय व्यक्ती आणि त्याची 48 वर्षीय पत्नी गाडीत बसले होते. ही गाडी थेट पुलावरून उडून वर्दळीच्या रस्त्यावर पडली. सुदैवाने, या अनियंत्रित कारमुळे कोणीतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघाताचा व्हायरल व्हिडिओ
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक कमेंट्स येत आहे. एका युझरने म्हटलं आहे की, अलिकडे गुगल मॅप्समुळे होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे लोकांना खूप भीती वाटते. यामुळेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले आहे की, “ही कसली गाडी आहे जी उंचावरून पडल्यानंतरही तुटली नाही?” दुसरा युझर लिहितो की, “गुगल मॅप्स हे वारंवार करते.” तिसरा लिहितो, “गुगल मॅप्स खरोखरच वाईट आहेत.” हा व्हायरल व्हिडिओ खूपच भयावह आहे.
SOURCE : ZEE NEWS