Source :- BBC INDIA NEWS

घटनास्थळाच्या व्हीडिओतील स्क्रीनग्रॅब

फोटो स्रोत, Screengrab/ANI

56 मिनिटांपूर्वी

गोव्याच्या लैराई देवीच्या यात्रेमध्ये पहाटे चेंगरा-चेंगरी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृ्त्यू झाला असून 50 हून अधिक जखमी असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविक या देवीच्या उत्सवासाठी मंदिरात जमले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलं नसल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत घटनेबाबत माहिती दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

“आज सकाळी शिरगाव येथील लैराई जत्रेत झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीमुळं मी खूप दुःखी आहे,” असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.

प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही दिली.

“आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी बोलून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि या कठीण काळात पूर्ण पाठिंबा दिला,” असंही प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.

ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC