Source :- ZEE NEWS

Train To Desert World Most Dangerous Train Journey:  जलद आणि सुलभ प्रवासाचे एकमेव माध्यम म्हणजे रेल्वे. जगभरात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास असेल तर तो आरामदायी व्हावा अशी प्रत्येक प्रवाशाची इच्छा असते. मात्र, जगात एका एक ट्रेन प्रवास आहे की या ट्रेनला 200 डबे असूनही प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही.  50 डिग्री तापमानात नॉन स्टॉप 20 तासांचा जगातील हा सर्वात भयानक रेल्वे प्रवास  आहे. 

या ट्रेनमध्ये प्रवास करणे अत्यंत धोकादायक मानले जाते. प्रवासी जीव धोक्यात घालून या ट्रेनमधून प्रवास करतात. 50 अंश तापमानाचा छताशिवायच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची हिंमत प्रवासी करतात. ही ट्रेन आफ्रिकन देश मॉरिटानियामध्ये धावते, ज्याला ट्रेन टू डेझर्ट (ट्रेन डू डेझर्ट) असे नाव देण्यात आले आहे. 

सहारा वाळवंटातून जाणारी ही ट्रेन 20 तासांत 704 किलोमीटरचा प्रवास करते. 200 डबे असलेली ही ट्रेन ओढण्यासाठी 3 ते 4 इंजिन लागतात. ही ट्रेन एक मालगाडी आहे, ज्यामध्ये प्रवाशांसाठी एक कोच जोडलेला असतो. प्रवासी एका लाकडाच्या तुकड्यावर बसून प्रवास करतात.  

मॉरिटानियाची राजधानी नौआकचॉटमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही ट्रेन प्रवासाचे एकमेव साधन आहे. 50 अंश अशा भयानक तापमानात प्रवासी नॉनस्टॉप 18 ते 20 तास प्रवास करतात. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये पिण्याचे पाणी किंवा शौचालयाची सुविधा नाही. 

ही प्रवासी ट्रेन नाही. पश्चिम आफ्रिकेतील सहारा वाळवंटातून लोहखनिज वाहतूक करण्यासाठी ही  ट्रेन  सुरू करण्यात आली होती. 704  किलोमीटर अंतर कापून, ही ट्रेन लोखंडी खाणींमधून बंदरापर्यंत लोहखनिजाची वाहतूक करते. या भागात राहणाऱ्या हजारो लोकांकडे वाहतुकीचे इतर कोणतेही साधन नाही. त्यामुळे प्रवासी जीव धोक्यात घालून अत्यंत भयानक पद्धतीने या ट्रेनने प्रवास करतात. 

संपूर्ण प्रवासात ट्रेन कुठेही थांबत नाही. स्वस्त आणि जलद प्रवासासाठी लोक लोखंडाच्या काठावरून प्रवास करतात. दिवसा कडक उन्ह आणि रात्री हाड गोठवणारी थंडी असा विचित्र तापमानाचा सामना करावा लागतो.  वाटेत काही अडचणीत अडकलात तर मदत उपलब्ध नाही. मोबाईल नेटवर्क नाही, पोलिस नाहीत, वैद्यकीय सुविधा नाही. हवामानाचे, वाळूच्या वादळ तसेच दहशतवाद्यांचा धोका या प्रवासादरम्यान असतो. 

SOURCE : ZEE NEWS