Source :- ZEE NEWS

World’s Shortest Flight : सर्वात लांबचा प्रवास करायचा असेल सर्वात प्रथम आपल्याला विमान आठवते. कारण प्रत्येकाला आकाशात उडणाऱ्या विमानामध्ये प्रवास करायला आवडतो. अनेकजण तर लांबचा पल्ला कमीत कमी वेळेत पोहोचण्यासाठी विमानाने प्रवास करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जगातील सर्वात लहान प्रवास करण्यासाठी किती अंतर असू शकते? तसेच हे अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागत असेल? चला तर मग जाणून घेऊयात जगातील सर्वात लहान हवाई सफर किती मिनिटांची आहे. 

दरम्यान, जगात असे एक उड्डाण आहे जे उड्डाणानंतर काही सेकंदातच लॅन्ड करण्यात येते. तुम्हालाही हे ऐकून विश्वास बसत नसेल ना. पण हे खरं आहे. 

कुठे आहे हे ठिकाण? 

आम्ही आज तुम्हाला स्कॉटलंडच्या ऑर्कनी बेटांवर असलेल्या वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे बेटांदरम्यानच्या उड्डाणाबद्दल सांगणार आहोत. या दोन्ही बेटांमधील उड्डाणाला जगातील सर्वात लहान उड्डाण म्हटले जाते. या उड्डाणाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. कारण हे जगातील सर्वात लहान उड्डाण आहे. या दोन्ही बेटांमधील प्रवासाचे अंतर हे फक्त 2.7 किलोमीटर इतके आहे. हेच अंतर विमानाला पार करण्यासाठी फक्त सरासरी 80 सेकंद लागतात. जर एखाद्या वेळी वाऱ्याची दिशा अनुकूल असेल तर हेच विमान हे अंतर 53 सेकंदामध्ये हे अंतर पार करते. 

आपण पाहिलं तर विमानाने प्रवास करायचा असेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक तास लागतात. मात्र, वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे या दरम्यानचा हा प्रवास फक्त 80 सेकंदात पूर्ण होतो. तुम्हाला वाटेल की हे इतक्या कमी अंतरासाठी विमान कसे उड्डाण घेते. परंतु, हे विमान दोन्ही बेटांमधील अंतर फक्त 53 सेकंदात पार करत असल्यामुळे या लहान हवाई प्रवासाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. 

इतक्या कमी अंतरासाठी हवाई प्रवास का करतात लोक? 

53 सेकंदात होणाऱ्या या प्रवासाबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यामध्ये काहींनी इतक्या कमी अंतरासाठी विमानाचा वापर का? असा सवाल केला जात आहे. खरंतर, या दोन्ही बेटांमध्ये ना कोणता रस्ता आहे ना कोणताही पूल. या दोन्ही बेटांमध्ये समुद्र आहे. या समुद्रातून बोटीने प्रवास करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे येथील लोकांना हवाई सेवा देण्यात आली आहे. ज्यामध्ये अत्यावश्यक सेवांसाठी ज्यामध्ये डॉक्टर, शिक्षक यांचा समावेश आहे. या प्रवासासाठी ब्रिटन-नॉर्मन BN2B-26 आयलंडर हे विमान वापरले जाते. ज्यामध्ये 8-10 प्रवासी प्रवास करू शकतात. हे विमान स्थानिकांसोबत पर्यटकांना देखील सेवा पुरवते. 

SOURCE : ZEE NEWS