Source :- ZEE NEWS
Nuclear Bomb Explosions: अणुबॉम्बच्या निर्मितीपासून ते अगदी हिरोशिमा आणि नागासाकी इथं झालेल्या नरसंहारापर्यंत प्रत्येक गोष्ट, संदर्भ धडकी भरवणारा आहे. अणुबॉम्ब हल्ल्यानंतरचा विध्वंस विनाशाकडे नेणाराच आहे. त्यामुळं कितीही महासत्ता राष्ट्र असली तरीही अण्विक हल्ल्याचं पाऊल उचलण्यापूर्वी जागतिक स्तरावर तणावपूर्ण मुद्द्यांची चर्चा करून त्या वादांवर तोडगा काढण्याचा प्रथमत: प्रयत्न केला जातो.
राहिला मुद्दा भारत आणि पाकिस्तानचा, तर ही दोन्ही राष्ट्र अण्वस्त्रसज्ज आहेत. मात्र अणुबॉम्बच्या बाबतीत भारतानं मात्र कायमच No First Use Policy ही भूमिका घेतली आहे. म्हणजेच कोणत्याही देशानं समोरून अणुबॉम्ब हल्ला केला नाही तोवर भारतही हल्ला करणार नाही. हो पण, हा महाभयंकर हल्ला झाल्यास बचाव करण्यासाठी मात्र भारत प्रतिहल्ला करणार हे निश्चित!
लक्षात घ्या…
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मुळातच अणूबॉम्ब हवेत स्फोट घडवून आणण्यासाठीच तयार केला जातो. या प्रक्रियेला एयर बर्स्ट डेडोनेशन असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगावं तर यामध्ये जमिनीपासून काही अंतरावर बॉम्बचा स्फोट घडवून आणला जातो, ज्यामुळं एका मोठ्या क्षेत्रावर या स्फोटाचा परिणाम दिसून येतो. अशा प्रकारच्या हल्ल्यांनी शहरंच्या शहरं उध्वस्त करण्याचा मनसुबा साधला जातो.
जमिनीच्या पृष्ठावर केला गेलेला बॉम्बहल्ला सर्वाधिक केंद्रीत लक्ष्य स्वरुपातील असतो, जिथं लहानशा जागेत मोठं नुकसान होतं. या हल्ल्यांमध्ये जमिनीखाली असणारे बंकर, शत्रूचे तळ, कमांड सेंटर उध्वस्त केले जातात. पृष्ठावर स्फोट झाल्यानं एका ठराविक भागामध्ये न्यूक्लिअर रेडिएशन अतिशय झपाट्यानं पसरूलून त्यामुळं मोठ्या प्रमाणात हानी होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेनं जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणूबॉम्ब हल्ले तेले होते. हे दोन्ही हल्ले एअरबर्स्ट प्रकारातील असून, यामध्ये तब्बल 1.40 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. नागासाकीमध्ये मृतांचा आकडा 74 हजारांहून जास्त होता. या हल्ल्यांचा परिणाम इतक्या गंभीर स्वरुपाचा होता की, आजही या शहरांमध्ये न्यूक्लिअर रेडिएशनचे परिणाम दिसून येतात हा हल्ला इतका भीषण होता, की त्यानंतर कधीच कुठंही अणूबॉम्ब हल्ला झाला नव्हता.
SOURCE : ZEE NEWS