Source :- ZEE NEWS

Rape Case: ब्रिटनमध्ये एका महिलेवर तिच्याच पत्नीने बलात्कार केल्याची घटना घडली असून या प्रकरणामध्ये न्यायालयानेही आरोपीला 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावणी आहे. या महिलेची ओळख लपवण्यासाठी ‘केट’ असं नाव देत ‘बीबीसी’ने या खटल्यासंदर्भातील सविस्तर वृत्तांकन केलं आहे. केटच्या पूर्वाश्रमीच्या पतीला न्यायालयाने बलात्कार, लैंगिक शोषण आणि हेतूपुरस्सर काही पदार्थ केटला खाऊ घालणे या आरोपांखाली दोषी ठरवलं आहे. विशेष म्हणजे गप्पा मारताना केटच्या पूर्वाश्रमीच्या पतीने हा गुन्हा कबूल केल्यानंतर तिने कोर्टात याचिका केली आणि तिला न्याय मिळाला.

झोपेच्या गोळ्या देऊन अत्याचार केला अन् फोटो काढले

आपल्याच पत्नीवर बलात्कार केल्यानंतर पाच वर्षांनी पतीने त्याच्या मानसोपचारतज्ज्ञाशी गप्पा मारता मारता गुन्ह्याची कबुली दिली. चहामध्ये झोपेचे औषध घालून केटला बेशुद्ध करुन तिच्यावर बलात्कार केला होता. पत्नीवर लैंगिक अत्याचार करतानाचे फोटोही त्याने काढले होते.  स्वतःहून या प्रकरणामधून तात्पुरती माघार घेतल्यानंतरही केटने पुन्हा जोमाने लढत धैर्याने न्याय मिळवल्याचं या संपूर्ण काळात दिसून आलं.

नेमकं घडलं काय?

केटने तिच्या पतीने वर्षानुवर्षे केलेल्या गैरवर्तवणुकीचं वर्णन न्यायालयासमोर केलं. अनेक हिंसक घटनांचे संदर्भ केटने न्यायालयासमोर दिले. प्रिस्क्रिप्शन केलेल्या औषधांचा गैरवापर पतीने केल्याचा दावा केटने न्यायालयासमोर केला. पती माझ्यासोबत असंवेदनशील लैंगिक कृत्ये करत असतानाच आपल्याला शुद्ध आल्याचं तिने न्यायालयामध्ये मंजूर केलं. मात्र हा आरोप पतीने फेटाळून लावत हा सारा प्रकार अनावधानाने झाल्याचा दावा केला. तसेच पतीने हे प्रकरण पोलिसांपर्यंत जायला नको अशी विनंती केटकडे केली. मात्र त्यावेळी आरोपीने पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याची कबुली मात्र पत्नीसमोर दिली होती. लैंगिक अत्याचार झाल्यानंतर भारावून गेलेली केट जवळपास वर्षभर गप्प राहिली. मात्र या साऱ्याचा मानसिक त्रास होऊ लागल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर केटने तिच्या बहिणीला हा सारा प्रकार सांगितल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. केटच्या पूर्वाश्रमीच्या पतीला अटक झाली. दुर्दैवाने, फक्त चार दिवसांनी, केटने खटला मागे घेतला, “मी तयार नव्हते,” असं केटने खटला मागे घेताना म्हटलं.

नक्की वाचा >> ऑफिस अवर्समध्ये गर्लफ्रेंडबरोबर S*x करताना झालेला मृत्यू ‘Industrial Accident’ च; कोर्टाचा निर्णय

मानसोपचारतज्ज्ञाकडील ती नोंद सर्वात मोठा पुरावा

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, केटचा विद्यमान पती घराबाहेर पडल्यानंतर सहा महिन्यांनी ती पुन्हा पोलिसांकडे आली. तिने यावेळेस एका गुप्तहेराची मदत घेतली. या गुप्तहेराने गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारेच, “तिने जे सहन केले तो सारा प्रकार म्हणजे बलात्कार आहे हे पुराव्यासहीत सिद्ध केलं,” असं केट म्हणाली. केटच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या वैद्यकीय नोंदींवरून केटने सांगितलेल्या घटनाक्रमाला दुजोरा मिळाला. त्याने मानसोपचारतज्ज्ञाला, “पत्नी झोपेत असताना तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तिला झोपेच्या गोळ्या दिल्या,” असा कबुलीजबाब दिला होता. हा एवढा सबळ पुरावा असूनही, क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) ने सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. मात्र न डगमगता, केटने पुन:विचार करण्यासाठी अर्ज केला. सहा महिन्यांनंतर, सीपीएसने आपला निर्णय बदलला आणि गुन्हा दाखल करुन घेतला.

न्यायालयाने काय म्हटलं?

अखेर 2022 मध्ये हा खटला न्यायालयात गेला. आठवडाभर चाललेल्या खटल्यानंतर, ज्युरीने सर्व बाबींवर आरोपीला दोषी ठरवलं. हा ‘बालात्कारा’चाच गुन्हा असल्याचं न्यायालयाने म्हटलं. शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांनी पती ‘स्वार्थी व्यक्ती’ असल्याचा शेरा दिला. पतीला केलेल्या कृत्याचा काहीच पश्चात्ताप नसून, 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

SOURCE : ZEE NEWS