Source :- BBC INDIA NEWS

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Reuters

2 तासांपूर्वी

रशिया आणि युक्रेन ‘तत्काळ’ युद्धबंदी आणि युद्ध समाप्तीबाबत वाटाघाटी सुरू करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत फोनवरून दोन तास झालेल्या संभाषणानंतर त्यांनी ही माहिती दिली.

हा संवाद ‘अत्यंत चांगला’ झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं. शांततेसाठीच्या अटी रशिया आणि युक्रेन यांच्यामध्येच ठरवण्यात याव्यात असंही त्यांनी म्हटलं.

ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला. त्यांची भूमिका जरी आशावादी असली तरी नजीकच्या काळात कोणतीही युद्धबंदी किंवा शांतता करार होईल, असं चित्र दिसत नाहीये.

पुतिन यांनी म्हटलं होतं की, ते युक्रेनसोबत ‘भविष्यातील शांतता करारासंबंधीच्या मसुद्या’वर काम करण्यासाठी तयार आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं की, हा एक निर्णायक क्षण आहे आणि अमेरिकेने या चर्चांपासून स्वतःला दूर करू नये.

ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासोबतच्या संवादाबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं असलं, तरी शांततेसाठी नेमक्या केव्हा वाटाघाटी सुरू होतील याबद्दल काहीही स्पष्ट झालं नाही. अमेरिका आणि युरोपियन देशांनी मागणी केलेल्या 30 दिवसांच्या बिनशर्त युद्धबंदीबाबतही रशियन राष्ट्राध्यक्षांनी कोणतेही भाष्य केलं नाहीये.

‘पूर्ण आणि बिनशर्त युद्धबंदी’

ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनला ‘पूर्ण आणि बिनशर्त युद्धबंदी’ हवी असल्याचा पुनरुच्चार केला. यासाठी जर रशिया तयार नसेल तर त्यांच्यावर ‘अधिक कठोर निर्बंध’ असावेत असं स्पष्ट केलं.

ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील चर्चेपूर्वी बोलताना झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं की, युक्रेनविषयी कोणतेही निर्णय युक्रेनला न विचारता घेऊ नये. हा आमच्यासाठी ‘तत्त्वांचा प्रश्न’ आहे.

त्यांनी पुढे म्हटलं की, रशियाकडून यासंबंधी अधिक तपशील मिळाले तर आम्हालाही आमची भूमिका स्पष्ट करता येईल.

जागतिक नेत्यांसोबत चर्चा करताना झेलेन्स्की

फोटो स्रोत, Reuters

ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबतच्या संवादाबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं असलं, तरी शांततेसाठी नेमक्या केव्हा वाटाघाटी सुरू होतील याबद्दल काहीही स्पष्ट झालं नाही. अमेरिका आणि युरोपियन देशांनी मागणी केलेल्या 30 दिवसांच्या बिनशर्त युद्धबंदीबाबतही रशियन राष्ट्राध्यक्षांनी कोणतेही भाष्य केलं नाहीये.

ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनला ‘पूर्ण आणि बिनशर्त युद्धबंदी’ हवी असल्याचा पुनरुच्चार केला. यासाठी जर रशिया तयार नसेल तर त्यांच्यावर ‘अधिक कठोर निर्बंध’ असावेत असं स्पष्ट केलं.

ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील चर्चेपूर्वी बोलताना झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं की, युक्रेनविषयी कोणतेही निर्णय युक्रेनला न विचारता घेऊ नये. हा आमच्यासाठी ‘तत्त्वांचा प्रश्न’ आहे.

त्यांनी पुढे म्हटलं की, रशियाकडून यासंबंधी अधिक तपशील मिळाले तर आम्हालाही आमची भूमिका स्पष्ट करता येईल.

पुतिन-झेलेन्स्की

फोटो स्रोत, Getty Images

ट्रम्प यांनी पुतिनसोबतच्या संभाषणानंतर त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ पेजवर लिहिलं की, ‘रशिया आणि युक्रेन तात्काळ युद्धबंदी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे युद्ध समाप्तीसाठी वाटाघाटी सुरू करणार आहेत.’

ट्रम्प यांनी पुढे म्हटलं की, या वाटाघाटींच्या अटी दोन्ही देशांमध्येच ठरतील. कारण यामधील अनेक तपशील इतर कुणालाही माहिती नसतील.

झेलेन्स्की यांनी म्हटलं की, या वाटाघाटींत अमेरिकन आणि युरोपियन प्रतिनिधींनीही योग्य पातळीवर सहभागी व्हावं.

त्यांनी पुढे म्हटलं की, अमेरिकेने या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवू नये, कारण त्याचा फायदा केवळ आणि केवळ पुतिन यांनाच होईल.

‘अमेरिकेने सीमारेषा आखली आहे’

व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की, अमेरिका या चर्चांमधून माघार घेणार नाही. पण त्यांनी एक सीमारेषा आखून घेतली आहे, जी ओलांडून ते दोन्ही देशांवर कोणतीही जबरदस्ती करणार नाहीत.

रशिया आणि युक्रेनकडून काहीही प्रगती न होत असल्यामुळे नाराज झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. अशा परिस्थितीत अमेरिका चर्चांपासून दूर होऊ शकते, असा इशारा त्यांनी अलीकडच्या काही आठवड्यांत अनेक वेळा दिला होता.

रशियाच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे विचारल्यावर ट्रम्प यांनी म्हटलं की, माझ्या मते आता पुतिन यांनाही युद्ध संपवायचं आहे, त्यांनाही आता युद्ध पुरे झालं आहे.

सोची शहरातील एका संगीत विद्यालयातील कार्यक्रमात याविषयी बोलताना पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासोबतचं संभाषण हे मोकळेपणाचं, माहितीपूर्ण आणि सकारात्मक असल्याचं म्हटलं.

शांतता करारासाठी युक्रेनसोबत काम करण्याबाबत रशिया आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं एकमत झाल्याचंही पुतिन यांनी म्हटलं.

त्यांनी पुढे म्हटलं की, सर्व पक्षांमध्ये सहमती झाल्यास या प्रस्तावात शांततेसाठीच्या काही महत्त्वाच्या अटी-शर्ती तसंच एक संभाव्य कालमर्यादा निश्चित केली जाईल.

पुतिन

फोटो स्रोत, Reuters

पुतिन यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्याशी दुसऱ्यांदा फोनवर चर्चा केली. या संभाषणात युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लायन तसंच फ्रान्स, इटली, जर्मनी आणि फिनलंडचे नेतेही सहभागी होते.

उर्सुला यांनी म्हटलं की, शांततेसाठी ट्रम्प जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांचे आभार. अमेरिकेचं या चर्चेत सहभागी राहणं महत्त्वाचं आहे.

याआधी काय घडलं?

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं की, पोप लिओ यांनी शांतता चर्चांसाठी व्हॅटिकनमध्ये बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला असून सर्व देशांनी आणि अमेरिकेनं त्याचं स्वागत केलं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पोप यांनी व्हॅटिकनमध्ये चर्चा घडवून आणण्याची तयारी दाखवली होती. कारण पुतिन यांनी झेलेन्स्की यांची तुर्कीमध्ये थेट भेट घेण्याचा प्रस्ताव नाकारला होता.

ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

पुतिन शांतता हवी असे म्हणतात, पण ती केवळ बोलण्यापुरतंच असल्याचं युक्रेनने म्हटलं होतं.

झेलेन्स्की यांचे सल्लागार अँड्री यर्माक यांनी म्हटलं की, पुतिन यांना खरंतर युद्धच हवं आहे.

रविवारी (11 मे) रशियाने मोठा ड्रोन हल्ला केला, जो पूर्ण युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वांत मोठा असल्याचं युक्रेनने म्हटलं. रशियाने केलेल्या हल्ल्यात किमान 10 लोक मृत्यूमुखी पडले, यातील 9 लोक एका मिनीबसवर झालेल्या हल्ल्यात मारले गेले.

ट्रम्प यांनी तुर्कीमध्ये होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्याची तयारी दाखवली होती. पण पुतिन तिथेही गेले नाहीत.

रशियाने याआधीही काही वेळेस युद्धबंदी जाहीर केली होती. त्यांनी 8 ते 11 मे दरम्यान त्यांनी युद्ध थांबवलं इस्टरसाठीही 30 तासांची युद्धबंदीही जाहीर केली होती, पण दोन्ही बाजूंनी अनेक उल्लंघन झाल्याचा आरोप केला.

रशियाने फेब्रुवारी 2022 पासून आक्रमण केल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC