Source :- BBC INDIA NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरचं लहान मुलांसाठीचं ‘बा भीमा कॉमिक्स’ नेमकं काय आहे?

47 मिनिटांपूर्वी

लहान मुलांना बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी कळावं, या संकल्पनेतून ‘बा भीमा’ या कॉमिक्सचा जन्म झाला. कॉमिक्समध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातील काही खास घटना चित्ररुपात मांडण्यात आल्या आहेत.

कॉमिक्सचं संपादन करताना विशेष काळजी घेतल्याचं, संपादक सांगतात, तर कॉमिक्सच्या एका भागासाठी साधारण 1000 चित्रं काढावी लागली, असं चित्रकार संदीप भालेराव सांगतात.

‘बा भीमा’ या कॉमिक्स पहिल्यांदा 2023 मध्ये प्रकाशित झालं. एकूण 12 भागांमध्ये विभागलेले या कॉमिक्सचे सध्या 5 भाग प्रकाशित झाले आहेत.

  • रिपोर्ट, शूट आणि एडिट – राहुल रणसुभे

SOURCE : BBC