Source :- BBC INDIA NEWS

‘थंडीत आंदोलन करणाऱ्यांसाठी निवाऱ्याची सोय करा’; सरकारला दिलेल्या आदेशात हायकोर्टानं काय म्हटलं?

11 डिसेंबर 2025

अपडेटेड 6 मिनिटांपूर्वी

नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय पोषण आहारासाठी काम करणाऱ्या तसंच इतर शासकीय योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या महिलांनी धडक मोर्चा काढला.

कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपून रात्र काढली. त्यांच्यासाठी सरकारने सोय करावी, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

थंडीत आंदोलनकर्त्यांसाठी निवाऱ्याची सोय करा, आंदोलन करणे त्यांचा मूलभूत अधिकार आहे, त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाहीतर त्यांना रात्रभर थंडीत रस्त्यावर राहायला लागतं. सरकारने त्यांची सोय करावी, असे आदेश हायकोर्टाने दिले.

तसेच 3 सदस्यीय समिती नेमली असून ती या आंदोलनकर्त्यांवर लक्ष ठेवणार आहे आणि त्यांच्यासाठी निवारा उपलब्ध करून देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

काय आहेत त्यांच्या मागण्या? नागपुरात एवढ्या थंडीत त्या कशा रस्त्यावर राहत आहेत?

  • रिपोर्ट : भाग्यश्री राऊत
  • शूट – शाहीद शेख
  • एडिट – राहुल रणसुभे

SOURCE : BBC