Source :- ZEE NEWS

Jobs Layoff : साधारण दोन वर्षांपूर्वी जगभरात आर्थिक मंदीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. या वाऱ्यांच्या कचाट्यात अनेक बड्या कंपन्या आल्या, तर काही त्या संकटातूनही तरल्या. मात्र तेव्हा टळलेली नोकरकपात आता पुन्हा एकदा डोकं वर काढत असून हजारोंच्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी जवळपास त्यांची नोकरी गमावली आहे. 

सुरुवातीला ज्या कंपनीनं नोकरी कशी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवलं, ज्या कंपनीनं लाखोंचा पगार, पगारवाढ, हव्या तशा सुट्ट्या दिल्या त्याच कंपनीनं हे सारंकाही सवयीचा भाग होत असतानाच हजारो कर्मचाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला. ज्यामुळं सध्या नोकरदार क्षेत्रात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावर 3 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेणारी ही कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट. (Microsoft layoffs 2025)

मायक्रोसॉफ्टकडून कंपनीतून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी करण्यात आली असून, सर्व टीम, श्रेणी आणि देशांसाठी हा निर्णय लागू असले. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार व्यवस्थापकीय आराखडा आणि कंपनीला आणखी उत्तमोत्तम स्तरावर कार्यक्षम करण्यासाठी म्हणून कार्यपद्धतीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. 

गतकाळातील आकडेवारीवर नजर घातल्यास 2023 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये 2.28 लाख कर्मचारी सेवेत होते. कंपनीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कंपनीमध्ये असे काही धोरणात्मक आणि रचनात्मक बदल केले जात आहेत ज्यामुळं सध्याच्या स्पर्धेमध्ये कंपनीला टिकून राहण्यास मदत होईल. 

2023 मध्ये कंपनीतून 10000 कर्मचारी कपात करण्यात आली. मात्र यापूर्वी करण्यात आलेली कर्मचारी कपात कर्मचाऱ्यांच्याच कामगिरीवर आधारिक होती. मात्र यावेळी होणारी ही कपात रचनात्मक तत्त्वांवर केली जाणार आहे. जिथं व्यवस्थापकीय स्तरावरील पदांवर सर्वाधिक प्रभाव पडणार असून इंजिनिअरिंग विभागातील मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा सामना करावा लागणार आहे. 

हेसुद्धा वाचा : 1 लाख कोटींचा झाला Taj Hotel हा ब्रॅण्ड! 1903 मध्ये सहा रुपयला मिळणाऱ्या रुमचं आजचं भाडं…

सध्याच्या घडीला मायक्रोसॉफ्टकडून इंजिनिअरिंग आणि त्याहूनही AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) क्षेत्रातील गुणांना वाव दिला जात असून, एका प्रतिष्ठित माध्यमाच्या वृत्तानुसार ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीनं नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना 60 दिवस Payroll वर ठेवण्यात येणार असून ते रिवॉर्ड्स आणि बोनससाठीसुद्धा पात्र असतील. यानंतर मात्र त्यांना या संस्थेतून काढता पाय घ्यावा लागणार आहे. 

मायक्रोसॉफ्टच्या परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्येही बदल करण्यात येत असून, अंतर्गत माहितीनुसार ज्या कर्मचाऱ्यांना सुमार कामगिरीच्या कारणास्तव कंपनीनं बाहेरचा रस्ता दाखवला होता त्यांची रिहायर प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीनं “good attrition” नावाचं एक मेट्रिक सुरू केलं असून, या माध्यमातून कंपनीसाठी फायद्याच्या ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. 

SOURCE : ZEE NEWS