Source :- ZEE NEWS
Bill Gates Asperger’s Syndrome: मायक्रोसॉफ्टचे को-फाऊंडर आणि जगातील श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. त्यांची लेक फोएबे गेट्सने आपला पॉडकास्ट कॉल हर डॅडीध्ये यासंदर्भात खुलासा केलाय. बिल गेट्स सध्या एस्पजेर सिंड्रोम (Asperger’s Syndrome) झालाय. बिल गेट्स यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात याची थोडी चुणूक दिली होती. लहानपणी त्यांना सामाजिक संकेत समजण्यास अडचण येत होती. काही विषयांमध्ये त्यांना जास्त रस होता. ते अजूनही कधीकधी पाय हलवत राहतात, असेही लेकीने पॉडकास्टमध्ये सांगितले. पण एस्पर्जर सिंड्रोम म्हणजे काय? त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर
वेबएमडीच्या अहवालानुसार, एस्परजर सिंड्रोम हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. जो आता सामान्यतः ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) शी संबंधित असल्याचे मानले जाते. एस्पर्जर सिंड्रोम सामान्यतः बालपणात दिसून येतो. पण त्याची लक्षणे मूल 3 ते 9 वर्षांचं असताना स्पष्टपणे दिसून येतात. या सिंड्रोमने ग्रस्त मुले सामाजिक कार्यात स्वतःला सहभागी करून घेऊ शकत नाहीत. तसेच एक निश्चित दिनचर्या पाळू शकत नाहीत. या विकारामुळे लोक इतरांशी संवाद साधण्यात आणि भावनिक अभिव्यक्तीमध्ये मागे पडतात. अशा लोकांचा बुद्ध्यांक चांगला असतो पण त्यांना एकटेपणा जाणवतो.
अॅस्पर्जर सिंड्रोमची लक्षणे
अॅस्पर्जर सिंड्रोमच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया. याने ग्रस्त असलेल्या लोकांना सामाजिक संकेत समजण्यास अडचण येते, डोळ्यांशी संपर्क साधण्याची कमतरता असते, एकतर्फी संभाषण, एकाच विषयात जास्त रस असतो. अशा व्यक्तींना दिनचर्येतील बदल अजिबात आवडत नाही. मग ते वारंवार वेगवेगळे वर्तन करतात. अशी मुले सहसा इतरांपासून अलिप्त दिसतात आणि त्यांना मित्र बनवणे कठीण जाते. त्यांच्यातीव भाषेचा विकास सामान्य असला तरी त्यांची बोलण्याची पद्धत असामान्य किंवा एकरस असू शकते, असे डॉक्टर सांगतात.
अॅस्पर्जर सिंड्रोमची नेमकी कारणे
अॅस्पर्जर सिंड्रोमची नेमकी कारणे अद्याप निश्चित केलेली नाहीत. हा सिंड्रोम अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांच्या संयोजनामुळे असू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की, अॅस्परगर असलेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांना न्यूरोडेव्हलपमेंटल किंवा मानसिक आरोग्य समस्या असण्याची शक्यता जास्त असते. गर्भधारणेदरम्यान होणारे संसर्ग, गर्भाशयात मेंदूच्या विकासातील असामान्यता किंवा जन्मावेळी ऑक्सिजनची कमतरता हीदेखील या सिंड्रोमची संभाव्य कारणे असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.
अॅस्पर्जर सिंड्रोमवर उपचार काय?
अॅस्पर्जर सिंड्रोमच्या उपचारांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवे. अॅस्पर्जरवर कोणताही अचूक इलाज नाही. असे असले तरी तो वर्तणुकीय थेरपी, सामाजिक कौशल्य विकास कार्यक्रम, भाषण थेरपी आणि कधीकधी औषधांनी व्यवस्थापित केला जाऊ शकतो. संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (CBT) मुलांना त्यांच्या भावना आणि वर्तन समजून घेण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच शाळा आणि कुटुंबाच्या मदतीने बरीच सुधारणा शक्य आहे. ही एक अनुवांशिक आणि न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. म्हणून ती पूर्णपणे रोखता येत नाही. असे असले तरी गर्भधारणेदरम्यान चांगले खाणे, संसर्ग टाळणे आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे यामुळे एस्परजर सिंड्रोमचा धोका कमी करता येत असल्याचे डॉक्टर सांगतात.
SOURCE : ZEE NEWS