Source :- ZEE NEWS
ट्रॅव्हल व्लॉग्ससाठी प्रसिद्ध असलेला आणि युटूबरवर 1.7 लाखांहून अधिक फॉलोअर्स सबस्क्राइबर्स असलेला युट्यूबर लॉर्ड माइल्सने एक इंटरेस्टिंग गोष्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या एक्स अकाउंटवर एक अपडेट शेअर केले आहे. ब्रिटनमधील प्रसिद्ध युटूबर लॉर्ड माइल्स सध्या एका भन्नाट मिशनसाठी चर्चेत आहे.तब्बल एक वर्षापूर्वी दुबईमधील एका हॉटेलमधून चोरीला गेलेले त्याचे एअरपॉड्स प्रो (AirPods Pro) त्याला थेट पाकिस्तानात ट्रॅक झालेत. आता तो स्वतः तिथे जाऊन ते परत मिळवण्याच्या मिशनवर निघालाय.
एक्स अकाउंटवर दिली माहिती
लॉर्ड माइल्सने आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यात त्याचे एअरपॉड्स सध्या पाकिस्तानात कुठेतरी असल्याचं दाखवलं आहे. पोस्टमध्ये तो म्हणतो, “माझे AirPods चोरीला जाऊन एक वर्ष झालं, आणि आता मी स्वतः पाकिस्तानात जाऊन ते परत घेणार आहे!”
My AirPod pros have been lost for a year in Pakistan and guess who’s going to go there next week and get his property back! pic.twitter.com/yXnP7ZJdkf
— Lord Miles Official (@real_lord_miles) May 29, 2025
युटूबरने दिला थेट इशारा
पयडच्या एका पोस्टमध्ये त्याने सांगितले की हे एअरपॉड्स दुबईच्या एका हॉटेलमधून चोरीला गेले होते आणि आता ते पाकिस्तानात कुठेतरी “Lost Mode” वर ट्रॅक होत आहेत. तो म्हणाला “मी Lost Mode चालू केलंय आणि तेव्हा-तेव्हा ‘Find Me’ साऊंड प्ले करतो जेव्हा कोणी ते वापरतं आहे हे समजतं. आता मी पोलिस घेऊन त्या भागात घुसणार आणि हे सगळं कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करणार आहे. चोरांना अजिबात माफ नाही!” असा ठाम इशारा त्याने दिलाय.
त्याने “Taken” या चित्रपटाचा संदर्भ देत एक AI जनरेटेड फोटोही पोस्ट केला, ज्यात लिअम नीसन हातात एअरपॉड्स धरून उभा आहे. फोटोखाली त्याने “My AirPods were TAKEN! I will find you.” अशी लाईन लिहत इशारा दिला आहे.
My AirPods were TAKEN! I will find you pic.twitter.com/UCZ2KjHicU
— Lord Miles Official (@real_lord_miles) May 30, 2025
नेटिझन्सने उडवली खिल्ली
मात्र यानंतर सोशल मीडियावर लोकांनी मिशनची खिल्ली उडवायला सुरुवात केली. “तू इतका खर्च करून पाकिस्तानात जाशील? त्यापेक्षा नवीन एअरपॉड्स विकत घेणं स्वस्त नाही का?” असे एका युजरने लिहले. दुसऱ्याने लिहिलं, “AirPodsच्या 2% किंमतीत तुला नवीन मिळतील, पण तू विमानतळापर्यंतच 50 पट खर्च करणार.” काहींनी त्याला सल्ले द्यायला सुरुवात केली. म्हणाले “पाकिस्तानात जे AirPods आहेत ते कदाचित कोणी विकत घेतले असतील. आता ते त्याचे झालेत, तुझं मालकत्व संपलं, पुढच्या वेळी नावाचं स्टिकर लाव.”
लॉर्ड माइल्सचं हे मिशन कितपत यशस्वी होतं हे पाहणं रंजक ठरेल. पण एका एअरपॉड्ससाठी इतक्या मोठ्या प्रवासासाठी किंमत खरंच वाजवी आहे का? हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे.
SOURCE : ZEE NEWS