Source :- ZEE NEWS

India Pakistan War : भारताच्या हल्ल्यापाठोपाठ आता पाकिस्तानची अंतर्गत कोंडी सुरु झालीये.  बलुचिस्तानमध्ये BLA आर्मीकडून जोरदार हल्ले केले जातायत.पाकिस्तानी सैन्याच्या 14 पोस्टवर बलुचिस्तान आर्मीनं ताबा मिळवलाय. त्यामुळे पाकिस्तान चारही बाजूने अडकलाय. 

भारताला वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धकमी देणारा आणि दहशतवादाला पोसणारा पाकिस्तान आणखी अडणींनी घेरला गेलाय.एका बाजूला भारत पाकिस्तानातील दहशतवाद्यांना लक्ष करत जोरदार हल्ले करतोय. तर दुस-या बाजूला पाकिस्तानच्याच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ले होतायत. बलोच लिबरेशन आर्मी म्हणजेच BLAने पाकिस्तानच्या सैनिकांवर पुन्हा मोठा हल्ला करत पाकिस्तानी सैन्याला चितपट केलंय.

भारतासोबत पंगा घेतल्याने पाकिस्तानी सैन्याचे वाईट दिवस सुरू झालेत. भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलोच लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानाविरोधात मोर्चा वळवलाय.बलोच आर्मीने पाकिस्तानच्या क्वेटामधील 14 पोस्टवर ताबा मिळवत पाकिस्तानी सैन्याला उलट्या पायांनी पळून जायला भाग पाडलंय. इतकंच काय तर बुलच आर्मीने गॅस पाईपलाईनही उडवल्याचा दावा करण्यात आलाय.

या हल्ल्यांनंतर पाकिस्तान घेरला गेलाय. BLAने क्वेटावर हल्ला तर TTP म्हणजेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने पख्तूनख्वावर हल्ला केलाय. तर सीमाभागात भारताकडून जोरदार हल्ले होताय. त्यामुळे पाकचं चांगलंच कंबरडं मोडलंय.

बलुचिस्तानने वेगळा देश घोषित करण्याची मागणी केलीये.  UNOकडे बलुचिस्तानने ही मागणी केलीये. याच मागणीवरून बलुचिस्तान पाकिस्तानी सैन्याविरोधात आधीपासूनच आक्रमक झालाय. त्यातच आता भारतासोबत बलुचिस्ताननेही दहशतवादाला पोसणारं पाकिस्तान नेस्तानाबूत करण्याचा प्लान आखलाय. त्यामुळे पाकिस्तानची आता पळताभुईथोडी झालीये. 

बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने संपूर्ण बलूचिस्तान ताब्यात घेण्याचा दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, BLA ने बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या 14 चौक्या उद्ध्व्स्त केल्या आहेत. सोशल मीडियावर बलोच अॅक्टिविस्ट #OperationSindoorTillVictory आणि #PakisganLeaveBalochistan सारखे हॅशटॅग वापरून बलूचिस्तान हा वेगळा देश बनवण्याची मागणी करत आहेत. बलोच कार्यकर्ते मीर यार बलूच यांनी देवी दुर्गा मातेचा फोटो शेअर करत म्हटलं होतं की, प्रिय 1.4 अब्ज भारतीय बंधू-भगिनींनो आपण दोन महान संस्कृती आहोत. आपण एकमेकांचे दुःख समजून घेतो. तर आज आपण भारत माता आणि मातृभूमि बलूचिस्तानची रक्षण करुयात. आमच्या बंदुका हिंगलाज माता मंदिराची रक्षा करतील, आमच्या बंदुका हिंदूंना धर्मांतरित होण्यापासून वाचवतील. आपण शांती प्रस्थापित करु, आमच्या बंदुका तुम्हाला विजय मिळवून देतील, असं त्यांनी म्हटलं आहे. 

SOURCE : ZEE NEWS