Source :- ZEE NEWS
Early Oceans: समुद्र किंवा महासागर म्हंटल की डोळ्यासमोर येतात त्या निळ्या रंगाने चमकणाऱ्या लाटा. दोन अब्ज वर्षांपासून महासागर निळ्या रंगाचे नव्हते. महासागर वेगळ्याच रंगाने चमकत होते. जपानमधील नागोया विद्यापीठातील संशोधकां आज पर्यंतचा सर्वात मोठा वैज्ञानिक खुलासा केला आहे. जाणून घेऊया महासागर निळ्या नाही तर मग कोणत्या रंगाचे होते.
जपानमधील नागोया विद्यापीठातील संशोधकांनी अहवाल सादर केला आहे. पृथ्वीवरील सर्वात जुने महासागर 2 अब्ज वर्षांहून अधिक काळ निळ्या नाही तर हिरव्या रंगाने चमकत होते. नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्यूशनमध्ये हा शोध प्रकाशित झाला आहे. महासागरांचे पाणी हिरवे असण्यामागचे कारण देखील थक्क करणारे आहे.
सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. मात्र, पृथ्वीवर जीवसृष्टी उदयास येण्यासाठी सुमारे 80 कोटी वर्षे लागली. या काळात पृथ्वीला विस्तीर्ण महासागरांनी व्यापले होते. ज्यामध्ये हायड्रोथर्मल व्हेंट सिस्टमचा समावेश होता ज्यामुळे पाण्यात मोठ्या प्रमाणात लोह सोडले जात असे.
सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी सायनोबॅक्टेरिया हे जीव निर्माण झाले. आता हे शैवाल म्हणून ओळखले जातात. ऑक्सिजनिक प्रकाशसंश्लेषणात सहभागी होणाऱ्या पहिल्या जीवांपैकी ते एक होते. क्लोरोफिल वापरणाऱ्या आधुनिक वनस्पतींपेक्षा वेगळे, प्राचीन सायनोबॅक्टेरिया सूर्यप्रकाश कॅप्चर करण्यासाठी त्यांच्या अँटेनामध्ये फायकोबिलिन वापरत असत. सुमारे 2.4 अब्ज वर्षांपूर्वी घडलेल्या ऑक्सिडेशन घटनेत या अनुकूलनाने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे ऑक्सिजनयुक्त वातावरण निर्माण झाले.
सायनोबॅक्टेरियासारख्या जीवांनी उत्पादित केलेल्या ऑक्सिजनच्या वाढत्या पातळीमुळे समुद्रातील लोहाचे प्रमाण वाढले. परिणामी फेरस लोहाचे फेरिक लोहात रूपांतर झाले. फेरस लोखंडाच्या विपरीत, फेरिक लोखंड अघुलनशील असते, ते पाण्यातून गंजाच्या कणांच्या रूपात बाहेर पडते. या बदलामुळे महासागरांचा रंग देखील वेगळा होता.
फेरिक लोह बहुतेक निळा आणि लाल प्रकाश शोषून घेतो. ज्यामुळे हिरव्या तरंगलांबी पाण्यात अपवर्तित होतात. परिणामी, त्या वेळी महासागर हिरव्या रंगाचे होते असा दावा संशोधाकांनी केला आहे. “अनुवांशिक विश्लेषणातून असे दिसून आले की सायनोबॅक्टेरियामध्ये फायकोएरिथ्रिन नावाचे एक विशेष फायकोबिलिन प्रथिन होते जे हिरवा प्रकाश कार्यक्षमतेने शोषून घेते असेही संशोधनात सहभाजी झालेले वैज्ञानिक मात्सुओ म्हणाले.
SOURCE : ZEE NEWS