Source :- ZEE NEWS
Pakistan stock market: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. सार्क व्हिसा सूट धोरणांतर्गत पाकिस्तानी नागरिकांना दिली जाणारी सुविधा बंद करण्यात आली आहे. सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा तसेच पाकिस्तानींना भारत सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली जाणार असा इशारा पंतप्रधानांनी दिला. यानंतर पाकिस्तान शेअर मार्केटवर याचे परिणाम दिसून आले.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी खोऱ्यातील दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये 28 भारतीयांचा मृत्यू झाला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या.
त्यानंतर आज पाकिस्तानी शेअर बाजार उघडताच कोसळला. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (PSX) मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. आज सुरुवातीच्या व्यवहारात पाकिस्तानचा KSE-100 निर्देशांक 2.12 टक्के (2485.85 अंक) घसरून 1,14,740.29 अंकांवर आला.
पाकिस्तान शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला सुरुवात केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम पाकिस्तानी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर दिसून येतोय. भविष्यात होणारे गंभीर परिणाम ओळखून पाकिस्तानी गुंतवणूकदारांनी शेअर्स विकण्याला पसंती दिली.त्यामुळे गुरुवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांकडून बेछूट विक्री पाहायला मिळाली. ज्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले.
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय जाहीर केले. ज्यात सिंधू पाणी करार स्थगित करणे, वाघा-अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क अंतर्गत व्हिसा सूट रद्द करणे यांचा समावेश आहे. सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचे आहे. शेजारी देश त्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
भारतीय शेअर बाजारात थोडीशी घसरण
दुसरीकडे या संपूर्ण घटनेचा भारतीय शेअर बाजारावर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. गुरुवारी दुपारी 1.40 वाजेपर्यंत, बीएसई सेन्सेक्स 0.36% (285.31 अंक) घसरणीसह 79,831.18 अंकांवर आणि एनएसई निफ्टी 500.33% (80.55 अंक) घसरुन 24,248.40 अंकांवर व्यवहार करत होता. आज सेन्सेक्स 58.06 अंकांच्या घसरणीसह 80058.43 अंकांवर उघडला आणि निफ्टी 5051.05 अंकांच्या घसरणीसह 24,277.90 अंकांवर उघडला.
SOURCE : ZEE NEWS