Source :- ZEE NEWS

Pakistan Viral video : पाकिस्तानला स्वत:च्या घरात सुरू असलेलं गृहयुद्ध आवरता येत नाही. मात्र, तरीही पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला पोकळ धमक्या देणं सुरूच आहे. अशातच आता सोशल मीडियावर पाकिस्तानमधील आर्मी आणि तिथल्या पोलिसांमधल्या वादाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यात पोलीस अधिकारी पाक आर्मीला धमकी देताना दिसत आहेत.  नेमकं व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे? पाहूयात सविस्तर

पाकिस्तान आर्मी, पोलिसांमधल्या वादाचा व्हिडिओ समोर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होणार अशी चिन्ह सध्या दिसत आहेत. पाकिस्तानकडून अनेक धमक्या देखील येत आहेत. अशातच आता पाकिस्तान आर्मी आणि पाकिस्तान जिल्हा पोलिसांमधल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानमधील एक पोलीस अधिकारी थेट पाकिस्तानी आर्मीलाच धमकी देताना दिसतो आहे. 

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देणार म्हणून पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. मात्र, तरीही पाकिस्तानी नेते आपल्या तोंडाला आवर घालायला तयार नसून वारंवार भारताला धमकी देत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांचीच आर्मी आणि पोलीस पाकड्यांना आरसा दाखवत आहेत. कारण पाकिस्तानमधली परिस्थिती एवढी बिकट झालीय की छोट्या-छोट्या गोष्टीवरुन पाकिस्तानी आर्मी आणि पोलिसांमध्येच झडप झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या मारवत पोलिसांनी थेट पाकिस्तानी आर्मीलाच धमकी दिली आहे.

भारतला धमकी देणारे पाकडे आपआपसात भिडले

भारतानं दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान पोलीस दल आणि आर्मी चांगलीच बिथरली आहे. तसेच दुसरीकडे बलुचिस्तानने देखील पाकवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी आर्मी आणि पोलिसांमध्ये वाद वाढल्याचं निवृत्त कर्नल सूर्यकांत चाफेकर यांनी म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर पाकिस्तानी पोलिसांनी पाकिस्तानी आर्मीच्या विरोधात बंड पुकारल्याचं दिसत आहे. आर्मीचा मेजर काय करणार, त्याच्यासारख्याला नोकरीला ठेवतो अशी धमकी एक पोलीस अधिकारी देतांना दिसत आहे. या व्हिडिओनंतर पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे भारताला धमकी देणाऱ्या पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्थाच वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे.

SOURCE : ZEE NEWS