Source :- ZEE NEWS

India Pakistan War: पाकिस्तान सध्या दुहेरी संकटाला तोंड देत आहे. एकीकडून भारत तर दुसरीकडे जुन्या शत्रुनेही डोकं वर काढलं आहे. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकने भारतीय सीमेवर अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले. पण युद्धाची खुमखुमी असणाऱ्या पाकला आपल्या भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर देत पळता भुई थोडी केली आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले केले आहेत. भारताच्या या पवित्र्यानंतर पाकने 20 शहरांत आणीबाणी लागू केली आहे. तर एकीकडे भारताने दिलेल्या करारा जवाबनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानवर बलुचिस्ताननेदेखील वेगळा देश बनवण्याची मागणी करत आहे. हीच संधी साधत बलूचिस्तान हा वेगळा देश बनवण्यासाठी बलूचांचा एक समूह संयुक्त राष्ट्राकडे पोहोचला आहे. त्यांवा वेगळ्या बलूचिस्तानचा दावा केला आहे. 

पाकिस्तानपासून वेगळं होऊन बलूचिस्तान हा वेगळा देश करण्याच्या मागणीला जोर आला आहे. सोशल मीडियावर बलूचिस्तानचे राष्ट्रगान वाजत आहे. बलूचिस्तानी कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी UN ने मान्यता द्यावी, अशी अपील केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला ताबा सोडण्यासही सांगण्यात आलं आहे. बलूचिस्तानच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्राकडून मान्यता देण्यासाठी एक बैठक आयोजित करण्याची अपील केली आहे. तर, काही मीडिया रिपोर्टनुसार दावा केला आहे की, बलूचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये मागील 24 तासांत अनेक मोठे स्फोट झाले आहेत. 8 मेला पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनावरही बीएलएने हल्ला केला होता. त्यात 14 सेनिकांचा मृत्यू झाला होता.

बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने संपूर्ण बलूचिस्तान ताब्यात घेण्याचा दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, BLA ने बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या 14 चौक्या उद्ध्व्स्त केल्या आहेत. सोशल मीडियावर बलोच अॅक्टिविस्ट #OperationSindoorTillVictory आणि #PakisganLeaveBalochistan सारखे हॅशटॅग वापरून बलूचिस्तान हा वेगळा देश बनवण्याची मागणी करत आहेत. बलोच कार्यकर्ते मीर यार बलूच यांनी देवी दुर्गा मातेचा फोटो शेअर करत म्हटलं होतं की, प्रिय 1.4 अब्ज भारतीय बंधू-भगिनींनो आपण दोन महान संस्कृती आहोत. आपण एकमेकांचे दुःख समजून घेतो. तर आज आपण भारत माता आणि मातृभूमि बलूचिस्तानची रक्षण करुयात. आमच्या बंदुका हिंगलाज माता मंदिराची रक्षा करतील, आमच्या बंदुका हिंदूंना धर्मांतरित होण्यापासून वाचवतील. आपण शांती प्रस्थापित करु, आमच्या बंदुका तुम्हाला विजय मिळवून देतील, असं त्यांनी म्हटलं आहे. 

SOURCE : ZEE NEWS